NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / किडनी ट्रान्सप्लांट कसं होतं? एका Kidney वर सामान्य आयुष्य जगता येतं?

किडनी ट्रान्सप्लांट कसं होतं? एका Kidney वर सामान्य आयुष्य जगता येतं?

अनेक दिवसांपासून आजारी असलेले लालू यादव यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

110

राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. लालू यादव हे अनेक दिवसांपासून आजारी असून डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. त्यांचीच मुलगी रोहिणी आचार्य यांनी लालू यादव यांना किडनी दान केली. रोहिणी त्यांची दुसरी मुलगी आहे.

210

मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण कायद्यानुसार, दाता आणि प्राप्तकर्ता यांच्यात सामान्यतः रक्ताचे नाते असते. जसे पालक, भावंड, मुले, आजी-आजोबा आणि नातवंडे. यामध्ये पत्नीचाही समावेश असून तीही पतीला अवयवदान करू शकते.

310

याशिवाय रुग्णाचा एखादा मित्र किंवा जवळचा व्यक्ती स्वत:च्या इच्छेने अवयवदान करू इच्छित असेल तर त्यालाही तसे करण्याची परवानगी आहे. जर तुम्ही जिवंत असाल आणि तुमचे अवयव दान करू इच्छित असाल तर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. वयाच्या 70 वर्षापर्यंत मूत्रपिंड आणि यकृत दान करता येते.

410

सर्व प्रथम सर्व आवश्यक चाचण्या केल्या जातात. मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सर्वाधिक वेळ लागतो. कारण, केवळ रक्तगट जुळणे आवश्यक नाही, तर टिश्यू जुळणेही आवश्यक आहे. योग्य जुळणी झाल्यास चांगले परिणाम मिळतात. प्रत्यारोपणात, एखाद्या व्यक्तीचा अवयव शस्त्रक्रियेने काढून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित केला जातो.

510

शस्त्रक्रियेदरम्यान दात्याच्या शरीरातून किडनी काढून रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण केले जाते. अशा स्थितीत रुग्णाला तीन किडनी मिळतात आणि दात्याला एकच राहते.

610

नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशननुसार, किडनी हा जिवंत व्यक्तींद्वारे सर्वात जास्त दान केलेला अवयव आहे. कारण, निरोगी व्यक्तीसाठी एक किडनी देखील पुरेशी असते. आणि ते इतर लोकांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकतात.

710

दुसरीकडे मृत व्यक्तीची किडनी दुसर्‍या रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण केल्याने अनेकवेळा तितका चांगला परिणाम मिळत नाही. परंतु, जिवंत व्यक्तीच्या किडनीने रुग्णाचे आयुष्य सामान्य होते.

810

ऑस्ट्रेलियास्थित किडनी हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, 750 पैकी एक व्यक्ती फक्त एक किडनी घेऊन जन्माला येते. याशिवाय अनेक वेळा आजार किंवा इतर कारणांमुळे किडनी काढली जाते.

910

दोन्ही किडनी समान प्रमाणात म्हणजेच 50-50 टक्के काम करतात. परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती फक्त एक किडनी घेऊन जन्माला येते किंवा काही कारणास्तव दुसरी किडनी काढून टाकली जाते तेव्हा ती 75 टक्के काम करू शकते. त्यामुळे एक किडनी असतानाही जीवन सामान्यपणे जगता येते.

1010

किडनी ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार लहानपणापासून एकच किडनी असेल तर वयाच्या 25 वर्षांनंतर काही समस्या येऊ शकतात. मात्र, 25 वर्षानंतर किडनी दान केली किंवा काढून टाकली तर काहीच त्रास होत नाही. एक किडनी असलेल्या लोकांना कराटे किंवा किकबॉक्सिंगसारखे खेळ न खेळण्याचा सल्ला दिला जातो.

  • FIRST PUBLISHED :