पदार्थांवरील लेबल वाचा. लेबल पाहणं म्हणजे फक्त एक्सपायरी डेट नाही तर त्यामध्ये कोणकोणते घटक आणि किती प्रमाणात आहे तेदेखील तपासाल.
फळं-भाज्या खरेदी करताना ऋतूमानानुसार खरेदी करा यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहतं.
ताजं अंंडं, मासे, मांस, दुग्धजन्य पदार्थ कोणते आहेत हेदेखील तुम्हाला ओळखायला यायला हवं.
कोणत्या बाजारात आणि विक्रेत्याकडून चांगले खाद्यपदार्थ मिळतात त्याची माहिती असायला हवी.
फळं-भाज्या-कडधान्यं नीट धुवून घ्यायला हवेत.
खाद्यपदार्थ बनवण्यासाठी चांगलं तेल, मसाल्यांचा वापर करा.
अशाच खाद्यपदार्थांचं सेवन करावं जे नीट शिजलेले असतील.