मीठ आणि साखरेचा अति वापर मीठात हाय डाएटरी सोडियम असतं. ते प्रमाणात खाल्ल्याने ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. यासाठी मीठाशिवाय औषधी वनस्पती किंवा मसाल्यांचा वापर केल्यास जेवण रुचकर होऊ शकतं. यामुळे अति मीठ खाण्याच्या सवयीलाही आळा बसू शकेल.
प्रोसेस्ड फूड खाणं टाळा प्रोसेस्ड फूडमध्ये सोडिअम आणि फॉस्फरसचं प्रमाण खूप असतं. किडनीशी संबंधित आजार असणार्यांनी फॉस्फरसयुक्त पदार्थ खाणं अपायकारक ठरतं. संशोधनातून असं समोर आलंय, की किडनीचे विकार नसणार्यांनी प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने त्यातल्या अतिरिक्त फॉस्फरसमुळे किडनी आणि हाडांची मोठ्या प्रमाणावर हानी होते.
पुरेसं पाणी न पिणं भरपूर पाणी पिणं हे शरीरासाठी उपयुक्त ठरतं. त्यामुळे किडनीमार्फत शरीरातले विषारी आणि सोडियमयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकणं सोपं होतं. तसंच भरपूर पाणी पिण्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. यासाठी पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवणं आवश्यक आहे.
अपुरी झोप रात्रीची झोप तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे किडनीचं आरोग्यही चांगलं राहतं. झोपण्या-उठण्याच्या वेळेनुसार किडनीचं कार्य ठरत असतं. 24 तासांत किडनीचं एकूण कार्य कसं असेल हे झोपेनुसार ठरतं.
अति मांसाहार टाळा मांसाहार केल्याने रक्तातलं आम्लाचं प्रमाण वाढतं. परिणामी, हे किडनीसाठी हानिकारक ठरते. त्यामुळे एसिडोसिसचा त्रास वाढतो. अर्थात, किडनी शरीरातलं अतिरिक्त आम्ल बाहेर टाकण्यास असमर्थ ठरते. शरीराचं एकूण कार्य अव्याहतपणे चालू राहण्यास प्रोटीन्सची गरज असते. ही प्रोटीन्स फळं आणि भाज्यांच्या सेवनातून मिळतात. त्यामुळे किडनीचं कार्य सुरळीतपणे चालतं.
अति गोड खाणं टाळा अति गोड खाल्ल्याने वजन वाढतं. परिणामी, डायबेटीस आणि हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी हे घातक ठरतं. डेझर्टसह साखरमिश्रित पदार्थ आणि कोल्ड-ड्रिंक्स ही किडनी विकाराची प्रमुख दोन कारणं आहेत. तसंच व्हाइट ब्रेड खाणं टाळा. कारण त्यात साखरेचं प्रमाण खूप असतं.
सिगारेट टाळा सिगारेटमुळे फुफ्फुसांची मोठ्या प्रमाणावर हानी होते. तसंच हृदयावर आणि किडनीवरही त्याचा गंभीर परिणाम होतो. सिगारेट ओढणार्यांच्या युरिनमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण खूप असते. त्यामुळे किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.
मद्यपान टाळा प्रमाणापेक्षा जास्त दारू पिणं हानिकारक ठरतं. यामुळे किडनीचे विकार अधिक बळावतात. दारूसोबत सिगारेट ओढणार्यांना किडनीच्या विविध घातक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
एका जागी स्थिर बसणं टाळा दीर्घ काळ एका जागी बसून काम करणार्यांना किडनी विकारांचा सामना करावा लागतो. एका जागी बसून काम केल्याने किंवा शरीराची हालचाल न झाल्याने किडनीवर त्याचा कसा आणि काय परिणाम होतो यावर संशोधकांचं संशोधन सुरू आहे.
पेनकिलर्स टाळा वेदनाशामक औषधं अर्थात पेनकिलर्समुळे आजारावर त्वरित इलाज होतो; पण अति सेवन किडनीसाठी घातक असतं. किडनी विकार असलेल्यांनी पेनकिलर्स घेणं टाळावं. एनएसएआयडीच्या नियमित सेवनावर बंधन घाला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरावीक प्रमाणातच त्यांचं सेवन करा.