NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / International Tiger Day 2021: राज्यात वाढतेय वाघोबांची संख्या; सर्वाधिक वाघ कुठे? पहा टॉप 7 व्याघ्र अभयारण्यांविषयी

International Tiger Day 2021: राज्यात वाढतेय वाघोबांची संख्या; सर्वाधिक वाघ कुठे? पहा टॉप 7 व्याघ्र अभयारण्यांविषयी

International Tiger Day : वाघ लुप्त होत चालले आहेत त्यामुळे जगभरात त्या विषयी चिंता व्यक्त केली जाते. महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढून 312 झाल्याने एक आशादायक चित्र आहे.

112

29 जुलै हा आंतरराष्ट्रीय वाघ दिवस म्हणून साजरा केला जातो.2010 साली रशिया मधल्या सेंट पीटर्सबर्गमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनामध्ये वाघ लोप पावत चालल्याबद्दल चिंता व्यक्त करत आंतरराष्ट्रीय वाघ दिनाची घोषणा करण्यात आली. 2022 पर्यंत वाघांची संख्या दुपटीने वाढण्याच्या उद्देशाने काम केलं जातंय.

212

भारताच्या विविध राज्यांमध्ये व्याग्र अभयारण्य आहेत. ज्यांना वाघ पाहायला आवडतो त्या लोकांसाठी हे व्याघ्र प्रकल्प पर्वणीच आहेत. जाणून घेऊयात देशातले 7 महत्वाचे व्याघ्रप्रकल्प

312

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर - महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढायला लागली आहे. राज्यात एकूण 312 वाघ आहेत. त्यातले सगळ्यात जास्त वाघ चंद्रपूरच्या या अभायारण्यात आहेत. हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प आहे.

412

1955 पासून अस्तित्वात असलेलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि 1986 मध्ये त्यात समाविष्ट करण्यात आलेलं 508 स्क्वेअर किलोमीटरचं अंधारी अभयारण्य या दोन्हींचा मिळून आजचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे.

512

मेळघाट अभयारण्य, अमरावती - अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जातो. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे, रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगाय, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरअसे पुष्कळ प्राणी आहेत.

612

जिम कॉर्बेट टायगर रिझर्व उत्तराखंड- हिमालयाच्या कुशीमध्ये उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट टायगर रिझर्व 500 वर्ग किलोमीटर क्षेत्रांमध्ये आहे. 1936 मध्ये या उद्यानाची स्थापना करण्यात आली. याठिकाणी जंगल सफारी करून वाघ पाहण्याचा आनंद घेता येतो.

712

रणथंबोर टायगर रिझर्व,राजस्थान- हे अभयारण्य देखील देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. याआधी हे ठिकाण जयपूरच्या राज घराण्यासाठी शिकारीचं ठिकाण होतं. या ठिकाणी मोठ्या संख्येने वाघ आहेत.

812

1,134 वर्ग किलोमीटर क्षेत्रावर हे अभयारण्य वसलेला आहे. याठिकाणी बंगाल टायगर्स पाहायला मिळतात. याशिवाय कोल्हे,लांडगे,अस्वल आणि सांबर देखील पाहण्याचा आनंद घेता येतो.

912

बांधवगड टायगर रिझर्व, मध्यप्रदेश- बांधवगड हे अभयारण्य वाघांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. इथे देशातले सगळ्यात जास्त वाघ आहेत. त्या ठिकाणी हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात 820 वर्ग किलोमीटरवर वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानामध्ये बंगाल टायगर्स पाहायला मिळतात.

1012

पेरियार टायगर रिझर्व केरळ- केरळच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्या बरोबरच या अभयारण्याला भेट देऊन वाघ पाहण्याचा आनंद घेता येतो.

1112

777 वर्ग किलोमीटरवर असलेल्या या अभयारण्यामध्ये बंगाल टायगर, सफेद वाघ, हत्ती, रान डुक्कर, सांबर हे प्राणी देखील पाहायला मिळतात.

1212

सुंदर्बन टायगर रिझर्व पश्चिम बंगाल- या अभयारण्यामध्ये बंगाल टायगर पाहण्याचा आनंद घेता येतो. वाघांसाठी रिझर्व असलेला या ठिकाणांमध्ये इतर प्राणी आणि पक्षी पाहयला मिळतात. मात्र या ठिकाणी जंगल सफारीची सुविधा नाहीये. त्यामुळे हे अभयारण्य पाहण्यासाठी पायी प्रवास करावा लागतो.

  • FIRST PUBLISHED :