NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / International Mens Day : 'कडक' भारतीय पुरुषांची जागा महिलांनी कशी घेतली?

International Mens Day : 'कडक' भारतीय पुरुषांची जागा महिलांनी कशी घेतली?

International Men's Day : एक काळ असा होता जेव्हा भारतीय पुरुषांना स्त्रियांच्या बाबतीत खूप पुराणमतवादी, कठोर आणि खोलवर रूढीवादी मानले जात होते. पण स्वत:च्या पायावर उभं राहणे आणि घराबाहेर पडून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी महिलांनी आग्रह केल्यानंतर भारतीय पुरुषही बदलत गेले. मात्र, महिलांच्या परिवर्तनात पुरुषांची भूमिका नाकारता येत नाही. जाणून घ्या 100 वर्षात भारतीय पुरुष किती बदलले आहेत.

18

शंभर वर्षांत पुरूषांच्या विचारसरणीत खूप बदल झाल्याचे दिसते. भारतातील पुरुषांची शंभर वर्षांपूर्वीची व्याख्या 21व्या शतकात पूर्णत: बदलली आहे. एकेकाळी भारतीय पुरुषांबद्दल असा समज होता की ते काहीही बोलले तरी त्यांच्या घरातील महिलांना त्याचं कोणत्याही परिस्थिती पालन करावेच लागत होते. महिलांनी घर सोडून नोकरी करण्याचा विचारही करता येत नव्हता. पण हळुहळू पुरुष बदलले आणि स्त्रियांचीही परिस्थितीही सुधारली. भारतातील महिला घराबाहेर पडण्याचा विचारही करू शकत नव्हती. अगदी घरातही वाचन आणि लेखनाचा विचारही करता येत नव्हता. जीवन कठीण होते. ती फक्त आज्ञाधारक होती. पुरुषाचं वाक्य ब्रह्मवाक्य होतं. वाद घालणे हा अक्षम्य गुन्हा होता.

28

1940 : विरोध असूनही शाळेत जाणाऱ्या महिलांची संख्या वाढत होती. पुरुषांमध्ये एक असा वर्ग निर्माण झाला, ज्यांना आपल्या घरातील स्त्रियांनी लिहिता-वाचायला हवे असे वाटत होते. परंतु, असे असूनही सामान्यतः महिलांच्या स्थितीत लक्षणीय बदल झाला नाही. त्यांना तोंड बंद ठेवून पुरुषांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करावे लागत होते. तो कसाही असला तरी च्यासाठी दैवत होते.

38

स्वातंत्र्यानंतर : परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात काही प्रमाणात बदलली. वाचन-लेखनातून वाढणारी महिलांची पिढी समाजात जागृती निर्माण करू लागली. मुलींच्या शिक्षणाला सामाजिक मान्यता मिळाली होती. फार कमी संख्येने महिला नोकरीकडे वळत होत्या. उच्चभ्रू घराण्यातील महिलांनी राजकारणात प्रवेश केला होता.

48

1960 : पण कुटुंबाचा प्रमुख अजूनही पुरुष होता. घर त्याच्याच मर्जीने चालत होते. महिलांच्या सीमा अजूनही ठरलेल्या होत्या. बुरखा पद्धतही सुरूच होती. पण स्त्रीही माणूस आहे आणि तिलाही कुटुंबात महत्त्वाचं स्थान मिळायला हवं असं त्याला वाटू लागलं.

58

1970 : महिला अधिकाधिक नोकऱ्यांकडे वळत होत्या. पण स्टिरियोटाइप संपले नव्हते. त्यांचं हसणं आणि बोलणं जणू गुन्हाच होता. तिला स्वत:चे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते, पण ती त्यासाठी धैर्य गोळा करू लागली होती.

68

1980 : महिला चळवळींचा प्रभाव आता जोरदारपणे दिसू लागला होता. महिलांच्या हक्काचा मुद्दा गांभीर्याने घेतला जाऊ लागला. महिला संघटनांचे म्हणणे ऐकू येऊ लागले. नव्या करिअरकडे वाटचाल सुरू केली. आर्थिक स्वावलंबनाला ती गांभीर्याने घेत होती. पुरुषांचा एक मोठा वर्ग या परिस्थितीमुळे संतप्त आणि निराश होता. ते घरी हुकुमशाही चालवायचे, पण आता पहिल्यांदाच त्यांना विरोधही होत आहे.

78

1990 : जग आपले दरवाजे उघडत होते, बदलत होते. जागतिकीकरणाचे युग दार ठोठावत होते. एक नवीन प्रकारचा आत्मविश्वास स्त्रियांमध्ये दिसू लागला. पोशाखापासून संभाषणापर्यंत. तिचा स्वतःवर विश्वास होता. रात्रभर जणू नवी क्रांती झाली. लाजऱ्याबुजऱ्या महिलांची जागा आत्मविश्वासी महिलांनी घेतली होती. शहरी स्त्रिया बदलल्या आहेत. परंतु लहान शहरे आणि खेड्यांमध्ये परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. पुरुष बदलत होता आणि नवीन परिस्थितीशी तडजोड करत होता.

88

21 व्या शतकाची सुरुवात : पुरुष आणि स्त्रियांच्या विविध प्रकारांचा उदय झाला. सारख्याच वागणाऱ्या जोड्या तयार होऊ लागल्या. नवरा अधिकच संवेदनशील होत होता. नोकरी करणाऱ्या बायकोशी त्याचे नाते बदलत होते. वर्चस्ववादी पुरुष आता फक्त भूतकाळाची सावली होता. तो बदलला होता पण तो खरच बदलला आहे का?

  • FIRST PUBLISHED :