NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / International dance day च्या निमित्तानं जाणून घ्या भारतातील विविध शास्त्रीय नृत्य प्रकार (PHOTOS)

International dance day च्या निमित्तानं जाणून घ्या भारतातील विविध शास्त्रीय नृत्य प्रकार (PHOTOS)

International Dance Day 2022: आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो. डान्स हा केवळ मौजमजेसाठी किंवा सेलिब्रेशनसाठी करण्याची गोष्ट नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही डान्स करण्याचे खूप फायदे आहेत. त्यातून आपल्या देशाच्या संस्कृतीचेही दर्शन घडते. भारतामध्ये भरतनाट्यम, कथकली, कथक यासह अनेक शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत. शास्त्रीय नृत्यांविषयी जाणून घेऊया.

16

भरतनाट्यम हा भारतातील सर्वात जुना शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. माहितीनुसार, हे भरताच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. पल्लव आणि चोल काळात त्याची लोकप्रियता सर्वाधिक होती असे म्हटले जाते. यात हात, तोंड, पाय आणि शरीराच्या इतर भागांचे 64 सिद्धांत आहेत.

26

कथकलीचा उगम दक्षिण भारतात झाला असे म्हणतात. नृत्याबरोबरच अभिनयही केला जातो आणि संगीतही वाजवले जाते.यामध्ये पौराणिक ग्रंथ आणि पुराणांवर अभिनय केला जातो.

36

कथ्थक ही उत्तर भारताची देणगी आहे आणि तेथील हा मुख्य शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. त्याला नटवरी नृत्य असेही म्हणतात.

46

मिळालेल्या माहितीनुसार, कुचीपुडी ही आंध्र प्रदेशची देण आहे. या शास्त्रीय नृत्याचा उल्लेख अनेक शिलालेख आणि साहित्याशी निगडित स्त्रोतांमध्ये आढळतो. कृष्णा जिल्ह्यातील कुचीपुडी गावावरून या नृत्याचे नाव पडले आहे.

56

ओडिसीच्या नावावरून हे स्पष्ट होते की ते ओरिसाशी संबंधित असेल. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातही त्याचा उल्लेख आला आहे. हे शास्त्रीय नृत्य आरोग्य राखण्यासाठी शिकता येते कारण ते अवयवांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करते.

66

मोहिनीअट्टम हा केरळमधील प्रमुख शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. तिथल्या मंदिरांमध्ये हे नृत्य केले जायचे. मान्यतेनुसार, हे भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराशी संबंधित आहे. यामध्ये लास्य शैली वापरली आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- कॅनव्हा)

  • FIRST PUBLISHED :