दरवर्षी 8 ऑगस्ट रोजी ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिवस’ (International Cat Day) साजरा केला जातो.
‘आंतरराष्ट्रीय मांजर दिवस’ सर्वप्रथम 2002 मध्ये साजरा करण्यात आला होता.
पशू कल्याणासाठी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय समितीद्वारे मांजरीच्या संरक्षणाची चर्चा केली गेली.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय कल्याण निधीने 8 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मांजर दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर दरवर्षी 8 ऑगस्ट रोजी जगभरात मांजर दिवस म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश मांजरीचे संरक्षण करणे हा आहे. याशिवाय माजंरीविषयी लोकांना जागरूक करणे आहे.
भारतात देखील मांजर दिवस साजरा केला जातो.
मांजर दिवस साजरा करण्याच्या तारखेबाबत अनेक देशांमध्ये मतभेद आहे. रशियामध्ये 1 मार्च, अमेरिकेत 29 ऑक्टोबर, तर जपानमध्ये 22 फेब्रवारीला ‘मांजर दिवस साजरा’ केला जातो.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मांजर दिवस साजरा होत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मांजरीचे व्हिडिओ आणि फोटो लोक शेअर करत आहेत.