NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी या 4 फळांचा आहारात करा समावेश

फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी या 4 फळांचा आहारात करा समावेश

Fruits for Lungs : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. योग्य आहार आणि व्यायाम करणं काळाची गरज आहे. फुफ्फुसं श्वसनप्रक्रिया चालवतात. फुफ्फुसं खराब झाल्यावर आपल्या शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळण्यास खूप त्रास होऊ लागतो. त्यामुळे शरीरात इतर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे फुफ्फुसांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं नसेल तर श्वसनासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे व्यायामासह आहारात फळांचा समावेश केल्याने त्याचा फायदा होऊ शकतो. ही चार फळं खाल्ल्यास फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं.

  • -MIN READ Trending Desk Lanja,Ratnagiri,Maharashtra
    Last Updated: November 16, 2022, 14:29 IST
16

डाळिंब - डाळिंब शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही. हे फुफ्फुसांशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्याचं काम करतं. डाळिंब खाल्ल्याने फुफ्फुसांचं फिल्टरेशन होतं. फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नियमितपणे डाळिंबाचे सेवन करू शकता.

26

सफरचंद - सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. या व्हिटॅमिन्समुळे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील इतर आजारही बरे होण्यास मदत होते. बदलत्या ऋतूमध्ये सफरचंदाचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

36

संत्री - संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी6 असतं. ही व्हिटॅमिन्स फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते संसर्गाशी लढण्याचं काम करतात आणि आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. तसंच संत्र्यांतील गुणधर्म फुफ्फुसांना सूज येण्याच्या समस्येपासून आराम देण्याचं काम करतात.

46

ब्लू बेरी - ब्लू बेरीमध्ये अँथोसायनिन्स असतात. हे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामुळे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून तुमचं संरक्षण होतं. फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ब्लू बेरीचं नियमित सेवन करू शकता. ब्लू बेरी आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात.

56

फुफ्फुसं शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासोबतच श्वास नियंत्रित ठेवण्याचं काम करतात. वाढतं प्रदूषण, धुम्रपानाची सवय आणि प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसांच्या कार्यात बिघाड होऊ शकते. परिणामी, आजारपण येण्याची शक्यता असते. आरोग्यावर परिणाम करणार्‍या अशा घटकांपासून फुफ्फुसांचं संरक्षण करण्यासाठी आहारात काही बदल करणं आवश्यक आहे.

66

दूध, दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचं सेवनही मर्यादित करायला हवं. जेव्हा तुम्ही त्यांचं जास्त प्रमाणात सेवन करण्यास सुरुवात करता तेव्हा ते फुफ्फुसासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे या पदार्थांऐवजी फळांचं सेवन केल्यास ते उत्तम राहील, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

  • FIRST PUBLISHED :