हे साऱ्यांनाच माहीत आहे की आपल्या बसण्याच्या सवयीमुळे पाठ दुखीचे आजार अधिक बळावतात.
योग्य पद्धतीने ऑफिसमध्ये बसणं गरजेचं आहे. खूप वेळ एकाच जागेवर बसल्यामुळे माकड हाडावर ताण पडतो.
याकडे दुर्लक्ष केलं तर गुडघेही निकामी होऊ शकतात. सततच्या बसण्यामुळे पाठ दुखीचा आजार अधिक वाढू शकतो.
पाठ दुखीमुळे तुम्हाला अन्य आजारही होऊ शकतात.
कंबर दुखीसोबत वजन कमी होणं, ताप येणं, तळपाय दुखणं तसंच गुडघे दुखणं यांसारखे आजार होऊ शकतात.
तसेच लघवी संबंधी समस्याही निर्माण होऊ शकतात.