NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / High BP चा त्रास असेल तर ही 3 फळं तुमच्यासाठी आहेत उत्तम; कंट्रोलमध्ये राहतं Blood Pressure

High BP चा त्रास असेल तर ही 3 फळं तुमच्यासाठी आहेत उत्तम; कंट्रोलमध्ये राहतं Blood Pressure

Fruits For High Blood Pressure: उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही मध्यम वयोगटातील आणि वृद्धांमधील सर्वात कॉमन आरोग्य समस्यांपैकी एक आहे. बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि इतर घटक रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरतात. सध्याच्या युगात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, ज्याचे कारण म्हणजे आहार, दैनंदिन दिनचर्या, व्यायाम न करणे इ. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी निरोगी आहारात फळांचाही समावेश करणे फायदेशीर ठरते.

15

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, उच्च रक्तदाब हा एक असा आजार आहे जो आयुष्यभर त्रास देतो. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते, तसेच यावर नियंत्रण न ठेवल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे मेंदूला धोका असतो, रक्तस्त्राव, पक्षाघातही होऊ शकतो. काही फळांचे सेवन करून रक्तदाब कसा नियंत्रित करू शकतो, याविषयी जाणून घेणार आहोत.

25

1. केळी केळी हे बारमाही फळ असून ते अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. केळ्यामध्ये आढळणारे पोषक तत्व रक्तदाबावर रामबाण उपाय म्हणून काम करतात, दररोज केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि स्ट्रोकपासून बचाव करण्यासही मदत होते.

35

2. किवी - किवी हे खूप पौष्टिक फळ आहे, त्यात अनेक पौष्टिक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत राहते, याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे शरीराला कोणत्याही आजाराशी लढण्याची ताकद मिळते.

45

3. आंबा - उन्हाळ्यात मिळणारे हे फळ केवळ चवीसाठीच नाही तर अनेक आजारांना दूर ठेवण्याचे काम करते. विशेष म्हणजे ब्लडप्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आंबा खाणे खूप फायदेशीर आहे

55

आंब्यात आढळणारे बीटा कॅरोटीन आणि फायबर हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, हे दोन घटक बीपी नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. जे आरोग्यासाठी चांगले आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :