NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / चुकीच्या सवयी सोडा! नाहीतर पडेल टक्कल; पाहा केसांसाठी काय करावं आणि करू नये

चुकीच्या सवयी सोडा! नाहीतर पडेल टक्कल; पाहा केसांसाठी काय करावं आणि करू नये

खरंतर आपल्याच काही वाईट सवयींमुळे केस गळतात (Hair Loss). पण, त्या चुका सुधारण्याऐवजी आपण ब्यूटी पार्लरकडे धाव घेतो.

18

सुंदर केसांसाठी आपण काय काय करत नाही? महागडे शाम्पू वापरतो, महागडे हेयर केअर टुल्स वापरतो. वेगवेगळ्या टिप्स आणि होम रेमेडीज, हेअर केअर रुटीन फॉलो करतो. मात्र तरी देखील केस चांगले होत नाहीत.

28

मग आपण पार्लर ट्रीटमेंटसाठी हजार रुपये खर्च करतो. पण आपण आपल्या वाईट सवयी सोडल्या नाही तर या सगळ्याचा आपल्या केसांवरती कोणताच चांगला परिणाम होऊ शकत नाही. केस निरोगी हवे असतील तर आपल्या वाईट सवयी सोडून द्या नाही तर टक्कल देखील पडू शकतं.

38

सकाळी केस धुतल्यानंतर ऑफिसला जाण्याच्या घाईमुळे आपण हेअर ड्रायरचा वापर करतो. केस सुकवण्यासाठी दररोज हेअर ड्रायरचा वापर करणं चुकीचं आहे. हेअर ड्रायरच्या गरम वाफेमुळे केसांची मुळं कमजोर होऊन गळायला लागतात. याशिवाय केस ड्राय झाल्यामुळे तुटण्याचा त्रासही होऊ शकतो. केस मोकळे सोडून वाळवणं नेहमी चांगलं. केस लवकर वाळावेत यासाठी हीट मोडवर ड्रायर ठेऊन वाळवल्याने केसांचं नुकसान होतं.

48

केस लवकर वाळण्यासाठी महिलाही ही चूक करतात. केसांमधला पाणी शोषून घेण्यासाठी टॉवेलने जोरात केस घासतात किंवा केस अतिशय घट्ट बांधून ठेवतात. यामुळेदेखील केसांची मुळं कमजोर होऊन केस गळायला लागतात.

58

मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलास्टिक हेअर बॅन्ड मिळतात. असे हेअर बॅन्ड सर्रासपणे वापरतात. ज्यामध्ये केस अडकल्यामुळे तुटायला लागतात.

68

कंडीश्नर हे केवळ केसांच्या वरच्या भागांमध्ये लावण्यासाठी असतं. पण ते केसांच्या मुलांनाही लावल्याने केस कमजोर होतात गळतात. चुकूनही स्कॅल्पवर कंडिश्नर लावू नये.

78

केस धुतल्यानंतर लवकर वाळत नाहीत. म्हणून महिला केस धुवण्याचा कंटाळा करतात. अशा अस्वच्छ केसांमध्ये बॅक्टेरिया वाढायला लागतो. स्कॅल्प इन्फेक्शन झाल्यामुळे केस कमजोर होतात. त्यामुळे आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा केस स्वच्छ धुवायला हवेत.

88

चांगल्या केसांसाठी ऑइल मसाज महत्त्वाचा असतो. मात्र बऱ्याच या महिलांना केसांना तेल लावायला आवडत नाही. तेल न लावल्यामुळे केसांना योग्य प्रकारे पोषण मिळत नाही. यामुळे केसांवरील नैसर्गिक चमक निघून जाते.

  • FIRST PUBLISHED :