NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / आपल्याच वाईट सवयी देतात डोकेदुखीला आमंत्रण; थोडा बदल संपवेल कायमचा त्रास

आपल्याच वाईट सवयी देतात डोकेदुखीला आमंत्रण; थोडा बदल संपवेल कायमचा त्रास

प्रत्येकालाच कधी ना कधी डोकेदुखीचा (headache) त्रास झालेला असेल डोकेदुखी झाल्यानंतर काहीच सुचत नाही की काम करण्याची इच्छा राहत नाही.

110

डोकेदुखीमुळे वेदनांमुळे त्रस्त झाला असाल तर, लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून बघा. रुटीन मधल्या काही छोट्या बदलामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

210

अपुरी झोप,वेळी-अवेळी खाणं, दिवसभराची धावपळ यामुळे डोकेदुखी होते. अपुऱ्या झोपेमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. योग्य वेळी जेवणाबरोबरच योग्य वेळी आणि पूर्ण झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे.

310

पूर्ण झोप घेतली तर, दुसर्‍या दिवशी आपल्याला उत्साही वाटतं. यामुळे झोपेचे वेळापत्रक बनवा आणि त्या वेळेस पूर्ण झोप घ्या.

410

दिवसभर आपण काय खातो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. काही लोकांना चहा,कॉफी, मद्यपान करण्याची सवय असते

510

याशिवाय तिखट,तळलेले पदार्थ, प्रोसेस फूड खाण्याची सवय असेल तर हे देखील डोकेदुखीचं कारण ठरू शकतं. त्यामुळे अशा सवयी असतील तर त्या बदलून टाका.

610

काही लोक डायटिंगच्या नावाखाली दिवसभर उपाशी राहतात किंवा कमी खातात. भूक लागल्यामुळे देखील ऍसिडिटी वाढून डोकेदुखी होऊ शकते. यामुळे नियमित चांगला आहार घ्यावा.

710

टेन्शन वाढल्यानंतर मायग्रेन सारखा त्रास व्हायला लागतो. मायग्रेनमध्ये तीव्र डोकेदुखी होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका.

810

यासाठी मेडिटेशन, योगा, व्यायाम याशिवाय वॉक करण्याने देखील फायदा होऊ शकतो. व्यायाम केल्यानंतर मन उत्साही राहतं. त्यामुळे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात.

910

धूम्रपानाची सवय असेल तर, आपल्या फुफ्फुसांवर त्याचा वाईट परिणाम होतो. याशिवाय इम्युनिटी देखील कमी होते.

1010

स्मोकिंगमुळे शरीराला फायद्या ऐवजी नुकसानच होत असतं. सिगरेटमध्ये निकोटीन असतं त्यामुळे रिकाम्या पोटी सिगारेट ओढल्यामुळे डोक्यामध्ये तीव्र वेदना होऊ शकतात.

  • FIRST PUBLISHED :