दोघांसाठी भावनिक गुंतवणूक टिकून राहण्यासाठी सेक्शुअल रिलेशनलाही महत्व आहे. स्त्री आणि पुरूषांच्या याबाबतीतल्या अपेक्षा आणि गरजा वेगवेगळ्या असल्या तरी, आवश्यकता दोघांनाही असते.
पतीपत्नीच्या नात्यात रोमान्सही महत्वाचा आहे.पण, कालांतराने नात्यातलं आकर्षण कमी व्हायला लागतं. त्यामुळे पत्नी सेक्ससाठी नकार द्यायला लागते. अशा वेळेस पुरूषांच्या मनात अनेक शंका येतात.
पुरुषांपेक्षा महिलांना शारीरिक संबंध बनवण्याची इच्छा कमी होत जाते. महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं एक महत्वाच कारण आहे. ज्याला हाइपोएक्टिव्ह सेक्शुअल डिझायर रिसोर्सर्डर (HSDD) म्हणतात. त्यामुळे महिलांची सेक्स करण्याची इच्छा कमी होत जाते.
स्त्रियांमध्ये लैंगिक इच्छा नसणं,कामेच्छा कमी होणं, सेक्ससाठी पुढाकार न घेणं अशी लक्षणं दिसत असतील तर, त्याची काही कारणं असू शकतात. शरीरात हार्मोनल बदल, वयानुसार सेक्शुअर हार्मोनमध्ये घट, गर्भधारणा आणि स्तनपान,रजोनिवृत्ती,तणाव, जोडीदाराशी वाद, सेक्शुअर ट्रॉमा अशी कारणं असू शकतात.
पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा निर्माण करण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. एक्सरसाईजमुळे आपलं शरीरं सुडौल होतं त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. यामुळे सेक्ससाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सची पातळी वाढवते.
पत्नीच्या उदास राहण्याची कारणं शोधा. डिप्रेशनमध्ये असलेल्या माणसाचा मूड आणि वागणं नकारात्मक होऊ शकतो. अशावेळी तिच्याशी चर्चा करून तिला मदत करा.
पत्नी नाराज,नाखुश असेल तर, तिचा सेक्स करण्याचा मूड नसेल. अशावेळी तिच्या बोलून नाराजीचं कारण जाणून घ्या आणि तिची नाराजी दूर करा.
सेक्स करताना नेहमीचा तोचतोपणा जाणवत असेल तर, त्याबद्दलही पत्नीबरोबर बोला. एकाचवेळी, एकाच ठिकाणी, त्याच नेहमीच्या सवयीने सेक्स केल्यावर त्यातील नावीन्य आणि आकर्षण संपल्यासारखं वाटत असेल तर, इंटीमसीसाठी नवीन गोष्टी ट्राय करा. ज्यामुळे तिचा उत्साह वाढेल.
एखाद्या महिलेला धुम्रपान किंवा मद्यपानाची सवय असेल तर,त्याचाही परिणाम सेक्स लाईफवर होतो. त्यामुळे व्यसनं सोडून द्या. याशिवाय काही शारीरिक समस्या असतील तर, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.