1 मेपासून 18+ सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. यासाठी लवकर नोंदणी सुरू होईल. तुम्हीसुद्धा कोरोना लस घेण्याच्या तयारीत आहात. पण त्याआधीच तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली तर काय?
कोरोनाची लक्षणं दिसू लागली तर तुम्ही कोरोना लस घेऊ शकता का? लसीकरणाआधीच कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यावर काय करावं?
अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीतील संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर अमेश अदलजा यांनी याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर कोरोना लस घेणं काही दिवस टाळायला हवं, असा सल्ला डॉ. अदलजा यांनी दिला आहे.
कारण तुमच्यात कोरोनाची लक्षणं असतील आणि कदाचति तुम्हाला कोरोना असेल तर तुम्ही इतरांनाही संक्रमित करू शकता.
CDC च्या गाइडलाइन्सनुसार कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर ती जोपर्यंत बरी होत नाहीत आणि ती व्यक्ती आयसोलेशनमधून बाहेर येत नाही तोपर्यंत कोरोना लस घेऊ नये.
आता तुम्ही जर कोरोना लशीचा पहिला डोस घेतला असेल आणि त्यानंतर तुमच्या कोरोनाची लक्षणं दिसू लागली तर दुसरा डोस थोडा उशिरा घ्यावा.
कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी 3 ते 4 आठवड्यांनी पुढे ढकलावा. याबाबत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
तज्ज्ञांच्या मते, पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना संक्रमण झालं तर बरं झाल्यानंतरही काही आठवडे कोरोना लशीचा दुसरा डोस घेऊ नये.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनच्या अभ्यासानुसार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी कमीत कमी तीन महिन्यांनंतर कोरोना लस घ्यावी. यामुळे शरीरातील अँटिबॉडी मजबूत होतात आणि जास्त दिवस टिकून राहतात.