NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / रात्री उशिरा जेवायची सवय करा बंद; Pancreas वर परिणाम झाला तर लागेल वाट

रात्री उशिरा जेवायची सवय करा बंद; Pancreas वर परिणाम झाला तर लागेल वाट

अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल तर, स्वादुपिंडाचं (Pancreas) कार्य शरीरात चांगल्या प्रकारे व्हायला हवं. त्यासाठी आहाराकडे लक्ष द्या.

111

पँक्रियाज म्हणजेच स्वादुपिंड पचनास मदत करणाऱ्या हार्मोन्स आणि एन्जाईमच्या उत्पादनात मदत करतं. त्याचबरोबरच शरीरामध्ये ते ब्लड शुगर निर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण देखील ठेवतं.

211

पँक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाचं काम आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. पचन व्यवस्थेचा महत्त्वाचा आणि छोट्या आकड्यांचा पहिला भाग म्हणजेच स्वादुपिंड किंवा पँक्रियाज.

311

पोटात छोट्या आतड्यांच्या पुढच्या भागांमध्ये स्वादुपिंड असतं. स्वादुपिंड अन्नपचनास मदत करणाऱ्या हार्मोन्स आणि एन्जाईमच्या उत्पादन मदत करतं. शरीरात निर्माण होणाऱ्या ब्लड शुगरच्या निर्मितीवर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत करतं.

411

शरीरातील फॅट,प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट कमी करण्यासाठी शरीरात डायजेस्टिव्ह एन्जाईम निर्माण करण्याचं काम पँक्रियाज करतं. शरीरात कार्बोहायड्रेट कमी झाले नाहीत तर वजन वेगाने वाढणं थकवा येणं हे त्रास व्हायला लागतात.

511

कोबी,ब्रोकोली,मुळा,पालक आणि टोमॅटो सारख्या भाज्या खाल्ल्यामुळे स्वादुपिंडाला फायदा होतो. लसुन देखील स्वादुपिंडाचा साठी उत्तम मानलं जातं. यामध्ये ऍन्टी एम्फ्लामेन्ट्री गुण असतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.

611

घरात बनवलेले साजूक तूप आव्होकाडो, नारळ तेल आणि ऑलिव्ह ऑईल खाल्ल्यामुळे देखील स्वादुपिंडाला फायदा होतो.

711

काकडी,टरबूज,स्ट्रॉबेरी,किवी ही फळं खाल्ल्यामुळे पँक्रियाजला फायदा होतो.

811

ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी चहा-कॉफी टाळून हर्बल टी किंवा कॉफीन फ्री प्येय घ्यावीत. कॅफीनमुळे स्वादुपिंड यामध्ये ऍसिडिटी निर्माण करणारे पदार्थ तयार होतात.ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी चहा-कॉफी टाळून हर्बल टी किंवा कॉफीन फ्री प्येय घ्यावीत. कॅफीनमुळे स्वादुपिंड यामध्ये ऍसिडिटी निर्माण करणारे पदार्थ तयार होतात.

911

जंक फूड खाण्यामुळे स्वादुपिंडाला डायजेस्टिव्ह एंजाइमची निर्मिती करण्यात जास्त ताकद लावावी लागते. याशिवाय ऍसिडिटी आणि पचनाच्या समस्याही होऊ शकतात. त्यामुळे जंक फूड दररोज खाऊ नये.

1011

शरीरात पाणी कमी झालं तर स्वादुपिंडाला सूज येते. त्यामुळेच पँक्रियाजच्या पेशी कायम हायड्रेट असणं आवश्यक असतं. त्यामुळे दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं.

1111

रात्री उशिरा जेवल्यामुळे स्वादुपिंडाच्या प्रक्रियेवरती दबाव येतो. याशिवाय उशिरा जमल्यामुळे वजनही वाढतं. त्यामुळे योग्य रात्रीचं जेवण योग्य वेळी घ्या. स्वादुपिंडाचं काम उत्तम राहण्यासाठी भरपूर आराम करावा आणि शक्य असल्यास लंघन किंवा उपवास करावा.

  • FIRST PUBLISHED :