घरातील वातावरण उबदार असेल तर कांदे बटाटे लवकर खराब होऊ शकतात. तेव्हा त्यांना नेहमी जास्त उष्णता किंवा जास्त गारवा नसेल अशा ठिकाणी ठेवावे. पावसाळ्यात शक्यतो हवेशीर ठिकाणी कांदे बटाटे साठवून ठेवा. असे केल्याने कांदे बटाट्यांना लवकर कोंब फुटणार नाही.
कांदे बटाटे साठवून ठेवत असताना दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. दोघांना एकात मिक्स करू नका. कारण या पदार्थांमध्ये आर्द्रतेमुळे कोंब फुटण्याची शक्यता असते.
काही लोक कांदे बटाटे अधिक काळ टीकून राहण्यासाठी त्यांना फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु ही पद्धत चुकीची आहे, त्यामुळे या कांदा बटाट्यांना कोंब फुटतात.
फ्रिजमध्ये ओलावा असल्यामुळे तिथे कांदे - बटाटे लगेच खराब होऊ शकतात. ओलाव्यामुळे ते अकुंरित होतात आणि लवकर खराब होतात.
तसेच फ्रिजमध्ये अर्धा चिरलेला कांदा किंवा बटाटा मुळीच ठेऊ नका. शक्यतो कांदे - बटाटे बाहेर - हवेशीर ठिकाणी साठवून ठेवा.