लॅव्हेंडर वनस्पती: काही लोकांना लॅव्हेंडरचा सुगंध आवडतो. हा सुगंध डासांसाठी जणू कर्दनकाळ ठरू शकतो. मच्छर नेहमी लॅव्हेंडरच्या सुगंधापासून दूर पळतात. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरात लॅव्हेंडरची रोपे लावू शकता. रोप लावणे शक्य नसल्यास, आपण डासां दूर करण्यासाठी लॅव्हेंडर तेल देखील वापरू शकता. (इमेज-कॅनव्हा)
झेंडूचे रोप : डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही झेंडूचे रोप घरात-परिसरात लावू शकता. झेंडूच्या रोपामध्ये पायरेथ्रम नावाचा पदार्थ असतो. ज्याचा उपयोग कीटकांपासून बचाव करणाऱ्या औषधांमध्येही होतो. डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी घराच्या खिडक्या आणि दारांजवळ झेंडूचे रोप लावू शकता. (इमेज-कॅनव्हा)
पुदिन्याचे रोप : उन्हाळ्यात डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही पुदिन्याच्या पानांचा वापर करू शकता. घराच्या आजूबाजूला पुदिन्याचे रोप लावून तुम्ही डासांना घरात जाण्यापासून रोखू शकता. दुसरीकडे घराच्या कानाकोपऱ्यात पुदिन्याची पाने ठेवल्यानेही डास येत नाहीत. तुम्हाला हवे पेपरमिंट ऑइल देखील वापरू शकता. (इमेज-कॅनव्हा)
बेजिल : बेजिलच्या झाडामध्ये नैसर्गिक कीटकनाशके आढळतात. बेजिलमुळेही डासांना मज्जाव होतो. यामुळे तुम्ही तुमच्या बागकामात तुळशीसारख्या बेजिलच्या रोपाचाही समावेश करू शकता. त्यामुळे घरात डास येण्यापासून बचाव होईल. (इमेज-कॅनव्हा)
रोझमेरी: रोझमेरीचा सुगंध डासांना अजिबात आवडत नाही. रोजमेरीच्या सुगंधाजवळ डास येत नाहीत. रोझमेरीची रोपे लावूनही तुम्ही डासांना घरात जाण्यापासून रोखू शकता. (इमेज-कॅनव्हा) (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. या गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)