NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / प्रिय व्यक्ती कायमची सोडून गेल्यानंतर स्वत:ला कसं सांभाळाल?

प्रिय व्यक्ती कायमची सोडून गेल्यानंतर स्वत:ला कसं सांभाळाल?

मानसिक आरोग्यासंबंधी काम करणाऱ्या कार्यकर्ता आणि लेट अस टॉक ऑर्गनायझेशनच्या संस्थापिक आणि वेलनेस कोच कंचन राय यांच्याशी न्यूज 18 ने बातचीत केली.

18

नुकतंच 2 बॉलीवूड कलाकारांना आपण गमावलं. शिवाय कोरोनाव्हायरसमुळेदेखील अनेक लोकांचा मृत्यू होता आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर खूप अस्वस्थ वाटतं. त्यात लॉकडाऊनमध्ये प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर त्याला शेवटचंही पाहायला मिळालं नाही तर तो धक्का सहनही होत नाही. अशा परिस्थिती स्वत:ला सावरणं अशक्य आहे. मात्र अशा परिस्थितीचाही सामना कसा कराल, याबाबत कंचन राय यांनी मार्गदर्शन केलं आहे.

28

तुमची जवळची व्यक्ती आजारी असेल किंवा तिचं वय जास्त असेल तर येणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्याचा प्रयत्न करा. 

38

 अनेकदा आपला प्रिय व्यक्ती आपल्यापासून कायमचा दूर गेला आहे, हे स्वीकार करणं खूप कठीण असतं. अशावेळी तुम्ही स्तब्ध होता, अजिबात व्यक्त होत नाहीत. दु:ख दाबून ठेवू नका. नाहीतर राग, चिंता आणि नशेचं कारण बनू शकतं. तुमच्या भावना व्यक्त करा, त्या लपवू नका किंवा दाबण्याचा प्रयत्न करू नका.

48

इतर जवळच्या व्यक्तींसमोर आपलं दु:ख व्यक्त करा. कुटुंब, मित्र आणि इतर व्यक्तींना दु:ख सांगितल्याने मन हलकं होतं. 

58

तुमच्या दु:ख, तुमच्या भावना आणि त्यावेळी मनात येणारे विचार शब्दात मांडून ठेवा. यामुळे भावनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. 

68

तुमचा दिनक्रम सुरूच ठेवा. थांबू नका. इतरांची मदत करा, जेणेकरून तुम्हाला चांगलं वाटेल. 

78

अशा व्यक्तींशी संवाद साधा ज्याला तुमची काळजी आहे आणि तुम्ही त्याला तुमच्या परिस्थितीबाबत सांगू शकता. 

88

स्वत:चा विचार करा, स्वत:शी संवाद साधा आणि सकारात्मक विचार करा.

  • FIRST PUBLISHED :