NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Silk Sarees: सिल्कच्या साड्या अशाप्रकारे धुवा घरच्या घरी, रंग आणि चमक वर्षानुवर्षे राहील कायम

Silk Sarees: सिल्कच्या साड्या अशाप्रकारे धुवा घरच्या घरी, रंग आणि चमक वर्षानुवर्षे राहील कायम

सिल्क साड्या ह्या कधीच ओल्ड फॅशन होत नाही. त्यामुळे महिला अनेक सण समारंभाच्या निमित्ताने या साड्या नेसताना दिसतात. परंतु सिल्कची साडी जर घाण झाली तर ती बाहेरून ड्राय क्लीन करून घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. तेव्हा काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी देखील सिल्कची साडी स्वच्छ करू शकता. ज्यामुळे साड्यांची चमक आणि रंग वर्षानुवर्षे टिकून राहील.

15

धुण्यापूर्वी लेबल वाचा : सिल्क साडी एकदा घातल्यानंतर लगेच धुवू नये, तर ती जवळपास चार ते पाच वेळा घातल्यानंतर धुणे चांगले रहाते. पण जेव्हाही तुम्ही साडी धुण्याचा विचार कराल तेव्हा सर्वप्रथम त्यावरील लेबल वाचा. कारण डिटर्जंटने सिल्क साडी धुतल्यास ती खराब होऊ शकते.

25

थंड पाणी वापरा : सिल्क साड्या धुण्यासाठी थंड पाणी वापरा. साडी धुण्याच्या काहीवेळा पूर्वी ती साडी थंड पाण्यात भिजवून ठेवा. गरम पाण्याने साडी धुतल्याने साडीची चमक आणि कलर फेड होऊ शकतो.

35

व्हिनेगर वापरा: साडी पाण्यात भिजवल्यानंतर एक बादली स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे पांढरे व्हिनेगर मिसळा. त्यानंतर सिल्कची साडी त्यात भिजवून साधारण दहा मिनिटे तशीच राहू द्या. नंतर ती पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा, अशा प्रकारे साडीवरील डाग दूर होण्यास मदत होईल.

45

साडी कडक उन्हात वाळवू नका: सिल्कच्या साड्या धुतल्यानंतर खूप जोरात पिळून घेऊ नका आणि काही वेळ अशीच ठेवा, जेणेकरून त्यातील पाणी निघून जाईल. काहीवेळाने साडी सावलीत सुकवण्यासाठी ठेवा त्यावेळी साडीवर सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्या. कारण सूर्यप्रकाशामुळे साडीची चमक कमी होण्याची भीती असते.

55

सिल्क साड्यांना कसे ठेवाल : सामान्य साड्यांसोबत सिल्कच्या साड्या कधीही ठेवू नका. यामुळे इतर साड्यांचे डिझाईन्स एकत्र चिकटू शकतात. अशावेळी सिल्कच्या साड्या नेहमी वेगळ्या जागी ठेवा आणि सुती कापडाने चांगल्या झाकून ठेवा. अशा प्रकारे तुमच्या सिल्कच्या साड्या पूर्णपणे सुरक्षित राहतील.

  • FIRST PUBLISHED :