बल्ब साफ करताना प्रथम वीज बंद आहे ना याची खात्री करून घ्या. मग बल्ब त्याच्या होल्डरमधून बाहेर काढा.
बऱ्याचदा सुरु असलेला बल्ब बंद केल्यावर तो काहीकाळ गरम राहतो. अशावेळी बल्ब साफ करण्यापूर्वी तो थंड होण्याची प्रतीक्षा करा. इलेक्ट्रिक बल्बमध्ये काही वीज शिल्लक असू शकते ज्याने तुम्हाला करंट पोहोचू शकतो. तेव्हा गरम बल्ब कधीही साफ करू नये.
बल्ब साफ करताना तो त्याच्या होल्डरमधून बाहेर काढा. कारण तो होल्डरमध्ये साफ करणे धोकादायक ठरू शकते.
बल्ब नेहमी सुक्या कपड्याने साफ करा, ओल्या कपड्याचा वापर बल्ब साफ करण्यासाठी धोकादायक ठरू शकतो. ओल्या कपड्याने बल्ब साफ केल्यास तो फुटण्याची शक्यता असते.
साफ केलेला बल्ब पुन्हा एकदा होल्डरवर लावा. आणि काही मिनिटांनी स्विच ऑन करा.