तुम्हाला चहा पितानाच स्मोकिंग करण्याची सवय असेल तर तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका पाचपट जास्त आहे. हा कर्करोग तुमच्या गळ्याला आणि पोटासाठी खूपच हानिकारक असू शकतो.
इसोफेगस नावाचा हा कॅन्सर असून यात गळा आणि पोट दोन्ही ठिकाणी प्रादुर्भाव होतो. स्मोकिंग करत चहा पिणाऱ्यांमध्ये हा धोका पाचपट जास्त असतो.
गरम चहा इसोफेगस टिश्यूला खराब करतो. यात शरीरातील अनेक भागांमध्ये समस्या होऊ शकत. त्यातच स्मोकिंगमुळे याचा धोका आणखी वाढतो.
याआधी झालेल्या अनेक संशोधनातून चहामुळे ट्युमर सारखे आजार दूर होतात असे समोर आले आहे. मात्र जर तुम्ही गरम खाद्यपदार्थ आणि पेयांसोबत स्मोकिंग करत असाल तर गळ्याचा इसोफेगस खराब होतो.
चहा गरम असो की थंड स्मोकिंग करताना त्याचे सेवन शरीरासाठी घातक आहे. यासाठी गरम पदार्थांसोबत स्मोकिंग करणे टाळा आणि डाएटकडे लक्ष द्या.