NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Hair Volume: गळतीमुळे केसांचा वॉल्यूम खूपच कमी झालाय? हे 3 सोपे उपाय घरच्या-घरी करून बघा

Hair Volume: गळतीमुळे केसांचा वॉल्यूम खूपच कमी झालाय? हे 3 सोपे उपाय घरच्या-घरी करून बघा

(Home remedies To Increase Hair Volume: स्त्री असो की पुरुष कोणाच्याही केसांचे सौंदर्य हे त्यांच्या केसांच्या लांबी आणि जाडी (वॉल्यूम) वरून दिसून येतं. केसांची जास्त काळजी न घेतल्याने केस झपाट्याने गळू लागतात. वॉल्यूम कमतरतेमुळे स्त्रियांना त्यांच्या केसांची लांबी कमी करावी लागते. त्यामुळे केसांची कोणतीही स्टाइल करणेही कठीण होते.

17

केसांमध्ये व्हॉल्यूम नसल्यामुळे ते ओपन ठेवणे देखील आपल्या लूकसाठी योग्य ठरत नाही. व्हॉल्यूमशिवाय, केस खूप हलके दिसतात.

27

अनेकजण वॉल्यूम येण्यासाठी सर्वकाही प्रयत्न करतात. जर तुम्हीही केस दाट करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी केसांची वॉल्यूम वाढवण्याचे सोपे उपाय सांगत आहोत.

37

अंड्याचा हेअर मास्क - अंड्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात 2 अंड्यांचा पांढरा भाग घ्या. आता त्यात 1 टेबलस्पून एलोवेरा जेल आणि 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल घाला. या सर्वाना चांगले फेटून घ्या. आता ते डोक्याच्या त्वचेवर लावा. असे केल्याने केसांची मुळे मजबूत होतील.

47

जास्त काळ केसांमध्ये ठेवण्याची गरज नाही. हे मिश्रण केसांवर फक्त 15 मिनिटे राहू द्या. यानंतर केस थंड पाण्याने धुवा. जर अंड्यांचा वास येत असेल तर तुम्ही त्याच्या मिश्रणात 1 लिंबू देखील मिक्स करू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू करा. हा हेअर पॅक दर आठवड्याला लावा. फरक केसांमध्ये दिसेल.

57

चहाचे पाणी - एका पातेल्यात पाणी उकळून त्यात एक चमचा चहाची पाने टाका. उकळी आल्यावर थंड करून स्प्रे बाटलीत ठेवा. त्यात 1 टेबलस्पून लिंबाचा रस आणि 1 टेबलस्पून गुलाबजल घाला. केसांना शॅम्पू करा आणि जेव्हा केस थोडेसे ओले राहतील तेव्हा केसांमध्ये हे स्प्रे करा.

67

केसांना अशा प्रकारे नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. चहा पाण्याचा उपयोग आठवड्यातून दोनदा करा, मग तुमचे केस दाट आणि दाट होऊ लागतील

77

मुलतानी माती - एका भांड्यात मुलतानी माती, कोरफडीचे जेल, बटाट्याचा रस आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट बनवा. ते केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवा. हा उपाय केसांची जाडी वाढवण्यास देखील मदत करतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :