NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मध्यरात्री पोटात कावळे ओरडतात? हे आहेत काही हेल्दी स्नॅक्स तुमच्यासाठी

मध्यरात्री पोटात कावळे ओरडतात? हे आहेत काही हेल्दी स्नॅक्स तुमच्यासाठी

रात्री जागरण झाले आणि भूक लागली तर काहीही अरबट-चरबट खाणं टाळा. त्याऐवजी हे हेल्दी आणि टेस्टी पर्याय नक्की ट्राय करा.

17

- काबुली चण्यांपासून बनवलेली चटणी खाणे अशावेळी फायद्याचे ठरते. तज्ज्ञांच्या मते ही चटणी खाल्ल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात तर राहतेच पण, खूप वेळपर्यंत भूक न लागण्यास याची मदतसुद्धा होते.

27

- सोयाबीनच्या (Soybean) शेंगांपासून बनवलेले स्नॅक्स अशावेळी फायदाचे असतात. एक कप हिरव्या सोयाबीन शेंगा उकडवून घ्यायच्या त्यात चवीनुसार मीठ, मिरची पावडर, लाल शिमला मिरचीचे तुकडे आणि चवीला जिरे पावडर टाकून एक छान नाश्ता बनवता येऊ शकतो. ह्या शेंगा शरीराला पुरेसे प्रोटीन देणाऱ्या तर आहेतच सोबत यात कॅलरी कमी असतात.

37

- अर्ध्या रात्री भूक लागण्याची सवय असल्यास आठवणीने किचनमध्ये पॉपकॉर्न (popcorn) ठेवलेले असावेत. पॉपकॉर्नमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यातून शरीराला फायबर (fiber) मिळतात शिवाय आपली भूक शांत होते.

47

पिस्ता- हेल्दी नाश्ता करायचा असेल तर पिस्ता अत्यंत लाभदायक असतो. प्रोटीन, फायबर आणि मेलाटोनिन यांचे प्रमाण पिस्त्यात (Pista) खूप जास्त असते. यानं शांत झोप लागते.

57

सुकामेवा (Dry fruits) - बदाम, शेंगदाणे, काजू असे एकत्र घेऊन खाल्ल्यास हा उपाय अत्यंत लाभकारी असतो. सुकामेवा खाल्ल्यास गुड फॅट्स, प्रथिनं आणि फायबरसारख्या गोष्टी शरीराला भुकेपासून दूर ठेवतात.

67

दूध - शरीरासाठी अत्यंत गुणकारी पेय म्हणजे दूध (milk). यात ट्रेप्टोफेन नावाचं अमिनो ऍसिड असतं. हे आपल्या शरीरातील मेलाटोनिन आणि सेराटोनिन हार्मोनला वाढवण्यास मदत करते. या हार्मोनमुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि शांत झोप लागते. रात्री-अपरात्री भूक लागल्यास दूध सर्वात योग्य आणि सोप्पा उपाय आहे.

77

हर्बल टी- झोपण्यापूर्वीच भूक लागण्याची सवय असणाऱ्यांनी हर्बल टी पिण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मध, दालचिनी टाकून हा बनवला जातो. निद्रानाश असणाऱ्या लोकांसाठी हर्बल टी गुणकारी असते.

  • FIRST PUBLISHED :