तेलकट पदार्थ आणि गोड खाल्ल्याने अनेकदा वजन वाढण्याची समस्या उद्भवते. तेव्हा व्यायाम करण्यासोबतच काही खास फळांचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही असं म्हंटल जात. सफरचंद या फळामध्ये पॉलिफेनॉल आढळतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. तेव्हा वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात सफरचंदाचा समावेश करू शकता. तसेच तुम्ही सफरचंदाचा ज्यूस देखील पिऊ शकता.
किवी हे फळ आकाराने जरी लहान असले तरी त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. या फळामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फोलेट आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करून देखील जर तुम्हाला यश येत नसेल तर तुम्ही आहारात संत्र या फळाचा समावेश करा. संत्र्याचे रोज सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
पपई वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. पपईमध्ये गॅलिक अॅसिड असते जे लठ्ठपणा कमी करण्यासाठी काम करते. पपई पचनासाठीही चांगली असते तेव्हा त्याचे काप करून अथवा त्याचा ज्यूस बनवून तुम्ही खाऊ शकता.