NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / प्रवासात नेहमी मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? मग हे उपाय नक्की ट्राय करून पाहा

प्रवासात नेहमी मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? मग हे उपाय नक्की ट्राय करून पाहा

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण गावी तसेच कुटुंबासोबत फिरायला जाणे पसंत करतात. परंतु याच दरम्यान प्रवास करताना अनेकांना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवतो. तेव्हा मग अशा परिस्थितीत प्रवासाची सगळी मजाच खराब होऊन जाते. या त्रासामुळे अनेकवेळा अशा लोकांना कुठेही जायला आवडत नाही. तेव्हा प्रवासावेळी उलटी येऊ नये, यासाठी काही खास टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

17

प्रवासात होणाऱ्या उलट्यांचा त्रासाला वैद्यकीय भाषेत 'मोशन सिकनेस' असं म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या जाणवते.

27

प्रवास करताना किंवा त्यापूर्वी तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. जेवल्यानंतर लगेच गाडीतून प्रवास करू नये. जेवण करण्यापूर्वी आणि जेवणानंतर काही काळ थांबावे. हलके अन्न खाल्ल्याने उलट्यांचा धोका कमी होतो.

37

कारमध्ये उलट्यांचा धोका कमी करण्यासाठी जेवणासोबत पाण्याचे सेवन वाढवा. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे उलट्यांचा धोका कमी होतो.

47

कारमध्ये बसल्यावर एसीऐवजी खिडकी उघडी ठेवून फ्रेश हवा घ्या. तसेच मागे बसण्याऐवजी पुढच्या सीटवर बसले तर बरे होईल.

57

सकाळी प्रवास करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप भिजवा आणि सकाळी सेवन करा. यामुळे प्रवासात उलट्या होणार नाहीत.

67

प्रवासात डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होत असेल तर प्रवासाला निघताना तोंडात एक लहान आल्याचा तुकडा ठेवा, यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. आल्याऐवजी तुम्ही आलेपाक किंवा आल्याची वडीही खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला उलटी आणि मळमळ यांपासून आराम मिळण्यास उपयोग होईल.

77

प्रवासा दरम्यान उलट्या होऊ नयेत यासाठी तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी काही औषध घेऊ शकता. तथापि, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे.

  • FIRST PUBLISHED :