दुधापेक्षा नारळाच्या पाण्यात जास्त पोषक तत्वे आढळतात. यामध्ये फॅटचे प्रमाण नगण्य असते, तसेच जे त्याचे नियमित सेवन करतात त्यांच्या शरीराला पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, त्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो.
आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डायबिटीज असलेले रुग्ण नारळ पाण्याचे सेवन करू शकतात. नारळ पाणी हे नैसर्गिक पेय असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असते.
डायबिटीजच्या रुग्णांनी नारळ पाणी पिल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते कारण या पाण्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे.
नारळाच्या पाण्यात असलेले मॅग्नेशियम इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. नारळ पाण्यामुळे शरीरातीलपाण्याची कमतरता दूर होते आणि ऊर्जा मिळते.
केवळ नारळ पाणीच नाही तर डायबिटीजचे रुग्ण नारळात असलेली मलाई देखील पाहू शकतात. नारळाच्या मलाईमध्ये पोषक तत्व असून ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
नारळात मिळणारी मलई खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होते, तसेच शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलला फायदा होऊन हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.