उन्हाळ्यात सॅलेड खाण्याचे भरपूर फायदे आहेत. त्यामुळे त्याचा रोजच्या जेवणात समावेश करावा. सॅलडमध्ये असलेलं फायबर वजन नियंत्रित करण्यात फायदेशीर आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात फ्रुट सॅलेड, व्हेजिटेबल सॅलेड, मिक्स सॅलेड खावे.
हायड्रेशन- उन्हाळ्य़ाच्या दिवसात सॅलेड खाल्ल्याने शरीराची पाण्याची गरज भागते. जास्त तहान लागत नाही. त्यामुळे डिहायड्रेशन टाळण्यासाठी सॅलड खा. त्यामुळे दिवसभरातला थकवा कमी होउन उत्साह वाढतो. शरीराबरोबर त्वचा देखील हायड्रेट राहते.
ब्लड सर्क्युलेशन-सॅलेड खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले राहतं. शरीराला हानिकारक असणरे पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीराचं संतुलन चांगलं राहतं
मिळेल भरपूर फायबर -आहारातील फायबरची गरज सॅलड पूर्ण करतं. उन्हाळ्यातच नाही तर, दररोज एक वाटी सॅलड खावं, त्यामुळे शरीरातला कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो.
फळांचं सॅलड - भाज्यांच्या सॅलडबरोबरच फळांचं सॅलडही फायदेशीर आहे. उन्हाळ्यात फळांचं सॅलड खावं. टरबूज, कलिंगड, डाळिंब,आंबा, केळी, पपई यांच्यापासून सॅलड बनवावं. त्यातून शरीराला पोषक तत्व मिळतील, शरीरातील पाण्याची मात्राही चांगली राहील.
मिक्स सॅलड-भाज्या, फळं आणि मोड आलेली कडधान्य मिक्स करून सॅलड बनवता येते. त्यामुळे पोषक तत्व वाढतात.
व्हेजिटेबल सॅलेड-भाज्यांचही सॅलड बनवता येतं. उन्हाळ्यात बीट, कांदा, टोमॅटो, काकडी आणि लींबाचा रस वापरुन सॅलड बनवाता येते. हे सॅलड चविष्ट तर असताच आणि पौष्टीकही असतं.
कॉर्न आणि एवोकाडो सॅलड-कॉर्न आणि एवोकाडो सॅलड पचनशक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. या सॅलेडने पोट हेल्दी ठेवण्यासाठी कॉर्न आणि एवोकाडोचं सॅलेड खावे.