दररोज अर्धा तास चालल्याने कोणत्याही प्रकारच्या कोरोनरी हार्ट डिसीजची भीती 19 टक्क्यांनी कमी होते. मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं.
दररोज चालण्याने आपला फिटनेस बराच काळ टिकून राहतो आणि बर्याच आजारांपासून आपलं संरक्षणही होतं.
चालण्यासाठी घराबाहेर पडायचं नसेल तर, आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत किंवा एखाद्या रुममध्ये देखील वॉक(Walk) घेऊ शकता. दिवसातून किमान 20 मिनटं ते 1 तास चालणं आवश्यक आहे.
दररोज किमान 30 मिनिटे ते 1 तास वेगात चालण्याने आजार दूर पळतात. एका संशोधनानुसार, दररोज जेवल्यानंतर 15 मिनिटं चालण्याने ब्लड शुगर कंट्रोल होऊ शकते.
हिप आणि गुडघ्याच्या हाडात वेदना होत असतील तर, दररोज वॉक करायला हवा. त्यामुळे स्नायू बळकट होऊन, लूब्रीकंट वाढण्यास खूप मदत होते. ज्यांना आर्थराइटिस आहे त्यांनी तर, दररोज चाललं पाहिजे.
वातावरणातील बदलामुळे लगेच खोकला आणि सर्दी होण्याचा त्रास असेल तर, इम्युनिटी वाढवण्यासाठी रोज चालावे. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता 45 टक्क्यांनी कमी होते.
आठवड्यातून किमान 2 तास चालण्याने मेंदूचे टिश्यू चांगल्या प्रकारे काम करतात. ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो.
दररोज 30 मिनिटं चालण्याने लठ्ठपणाची समस्या 50 टक्क्यांनी कमी होते. चालण्यामुळे मसल्स मजबूत होतात आणि कामं करण्याचा उत्साह वाढतो.
दररोज 30 मिनिटं चालण्याने मूड चांगला राहतो. स्ट्रेस, भीती, डिप्रेशन आणि निगेटिव्ह थिंकींग देखील कमी होतं आणि आपल्याला एनर्जीही वाढते. एवढेच नाही तर, मेंटल हेल्थ चांगली राहते.