दारू म्हटलं की चकणा आलाच. चणे-शेंगदाण्यासारख्या चकण्याची जागा आता आणखी काही पदार्थांनी घेतली आहे, ज्याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
चकण्यासोबत आता असे पदार्थ खाल्ले जात आहेत. ज्यामुळे दारूमुळे यकृतावर होत असलेला दुष्परिणाम अधिक पटीने वाढतो आहे.
हल्ली बरेच लोक दारूसोबत जंक फूड खात असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. यामुळे त्यांना शरीरात अनेक समस्या होत असल्याचं दिसलं. तज्ज्ञांच्या मते दारूसोबत 57% लोक जंक फूड खातात.
चटपटीत लागतात म्हणून असे पदार्थ खाल्ले जातात. विशेषतः तरुणांचा दारूसोबत फास्ट फूड खाण्याकडे कल जास्त आहे. पण दारूसोबत असे चटपटीत पदार्थ म्हणजे मोठ्या आजारांना आमंत्रण आहे.
उत्तर प्रदेशमधील डॉक्टर बृजेश शुक्ला म्हणाले, अशा लोकांना सर्वात आधी लिव्हरची समस्या होते. यकृताला सूज येते, शरीर लठ्ठ होतं, श्वास फुलतो, हृदयाची धडधड वाढते, हृदयाचे आजार, स्टोन अशा समस्या होऊ लागतात.
दारू तशी लिव्हरसाठी हानिकारकच पण त्यासोबत हेल्थी फूड घेतलं तर त्याचा दुष्परिणाम कमी होतो. पण जर जंक फूड खाल्लं तर दुष्परिणाम कित्येक पटीने वाढतो. (सर्व फोटो प्रतीकात्मक/सौजन्य - Canva)