डायबेटिज रुग्णांच्या शरीरातील ब्लड शुगर कंट्रोलमध्ये नसतं. यासाठी त्यांना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. औषधंही घ्यावी लागतात.
पण असं एक औषधी झाड जे डायबेटिज रुग्णांसाठी वरदानच आहे. दररोज या झाडाचं फक्त एक पान चावून खाल्ल्याने आठवडाभरातच शुगर कंट्रोलमध्ये येईल, असा दावा केला जातो आहे.
वनक्षेत्र अधिकारी मदन सिंह बिष्ट यांनी सांगितलं की आयुर्वेदात या झाडाचं खूप महत्त्व आहे. या झाडाचं पान कडू असतं पण शरीर आणि शुगरसाठी खूप फायदेशीर आहे. डायबेटिजच्या उपचारात हे झाड वरदानापेक्षा कमी नाही.
या झाडाची पाने केमिकलयुक्त साखरेला ग्लाइकोजनमध्ये बदलतं, जे मेटाबॉलिज्म प्रक्रिया वाढवतं. यामध्ये प्रोटिन, टेरेपेनोइड्स, फ्लेवोनोइड्स, अँटीऑक्सिडंट्स, एस्कॉर्बिक अॅसिड, आयर्न, बी कॅरोटीन, कोर्सोलिक अॅसिडही भरपूर प्रमाणात असतं.
या झाडाची पानं डायबेटिज रुग्णांची शुगर कंट्रोल करतात. योग्य प्रमाणात ही पानं चावून खाल्ल्याने ब्लड शुगर कंट्रोल करता येऊ शकतो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पान चावून खावं.
या औषधी वनस्पतीचं नाव आहे विरनोनिया हे झाड उत्तराखंडच्या हल्द्वानीमधील अनुसंधान केंद्रात आहे.
या झाडाबाबत अधिक माहितीसाठी किंवा हे झाड खरेदी करण्यासाठी या केंद्राला भेट द्या किंवा 9412958527 या फोन नंबरवर संपर्क साधू शकता.
ही माहिती अनुसंधान केंद्राने दिलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. न्यूज18लोकल याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.