काही लोक मनातल्या या पश्चातापावर(Regret)विजय मिळवतात आणि काही लोक मात्र त्या विचारांच्या कोंडीत अडकतात. या दु:खामुळे,लोक पुढे जाण्याऐवजी एकतर मागे पडतात किंवा योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास गमावतात(Confidence Loss).
भूतकाळात घडलेल्या घटना विसरा हे बोलणं जितकं सोपं आहे तितकंच ते करणं कठीण असतं. मनातील हिच पश्चातापाची भावना विसरण्यासाठी काही टिप्स उपयोगी पडतात जाणून घेऊयात.
आयुष्यातल्या ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पश्चात्ताप वाटतो त्या सर्व गोष्टी एका कागदावर लिहून काढा. जेव्हा आपण तो निर्णय घेतला तेव्हाची परिस्थिती लक्षात येईल. त्यामुळे तो निर्णय खरोखर काळाची गरज होती हे समजलं की मनातला पश्चाताप निघून जाईल.
ज्या गोष्टीचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे. त्या गोष्टी किंवा घटनेमधून, निर्णयातून आपण खरोखर काय शिकलो हेही लिहून काढा. त्या घडनेला जीवनाचा धडा म्हणून सकारात्मक विचाराने पाहिलं तर, विश्वासाने पुढे जाण्याचं बळ येईल आणि इतिहासात घेतलेला हा चुकीचा निर्णय भविष्यात आपली शक्ती बनू शकेल.
पश्चात्तापामधून बाहेर पडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःला क्षमा करणे. असा विचार करा की त्यावेळी आपण निर्दोष होतो आणि चुका कोणाकडूनही होऊ शकतात.
एखाद्याबरोबर काही चुकीचं केलं असेल किंवा आपल्या निर्णयामुळे एखाद्याचं मोठं नुकसान झालं असेल आणि आपल्याला पश्चाताप झाला असेल तर, त्या वेदनेमधून मुक्त होण्यासाठी क्षमा मागणं हा एकमेव पर्याय आहे.
क्षमा मागितल्याशिवाय ती भावना तुमचा पिच्छा सोडणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला त्रास होत राहिल.
आपण स्वतःची चुक स्विकारली तरच आपला मोठा विजय होईल. आपला अहंकार सोडा आणि मित्रांकडे किंवा कुटूंबीयांसमोर ती चुक मान्य करा म्हणजे तुम्हाला नक्कीच मन:शांती मिळेल.