सोयाबिन हा प्रोटीनचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. यात अंड आणि मटणापेक्षा जास्त प्रोटीन असतं. 100 ग्रॅम सोयाबिनमध्ये जवळपास 50 ग्रॅम प्रोटीन असतं.
100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे पनीरसुद्धा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे.
मुगाची डाळ आहारात वापरत नसाल तर, आजच खायला सुरुवात करा. कारण 100 ग्रॅम भिजलेल्या मुगामध्ये 22 ग्रॅम प्रोटीन असतं.
ड्रायफ्रुट्समध्ये बदाम प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहेत. 100 ग्रॅम बदामात 21 ग्रॅम प्रोटीन असतं.
काजू सुद्धा खायला हवेत. 100 ग्रॅम काजूमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन असतं
सर्वांच्या घरात दूध असतंच. एक लिटर दुधात 40 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे दूध रोज प्यायला हवं.
दही खाण्यास कधीच टाळाटाळ करू नका. कारण 100 ग्रॅम दह्यापासून 11 ग्रॅम प्रोटीन मिळतं.
प्रोटीन मिळवण्यासाठी मोड आलेली कडधान्य खावीत. 1 वाटी मोड आलेल्या कडधान्यात 15 ग्रॅम प्रोटीन असतं.
प्रोटीनचा मोठा स्त्रोत असूनही चण्यांकडे दुर्लक्षच होतं. 100 ग्रॅम चण्यात 15 ग्रॅम प्रोटीन आहे.
ब्रोकोली ही भाजी असली तरी, यात 3 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे शरीरात प्रोटीन कमी असेल तर, ब्रोकोली खायला सुरूवात करा.