NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / रोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा किती होतात फायदे

रोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा किती होतात फायदे

आजारपणात शरीराची ताकद वाढवण्यासाठी मोसंबीचा रस (Sweet Lime Juice) पिण्याचा सल्ला दिला जातो. यातील अ‍ॅन्टीऑक्सिडेन्टमुळे व्हायरल इन्फेक्शनपासून (Viral Infection) बचाव होतो आणि हाडंही मजबूत होतात.

17

आंबट गोड चवीचं रसाळ फळ म्हणजे मोसंबी. यात भरपूर पोषक घटक असतात. मोसंबीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात. मोसंबीने केवळ शरीराला ताकद मिळते असं नाही. तर, इतरही अनेक फायदे आहेत. मोसंबीचा रस पिण्याने शरीर हायड्रेटेड राहतं, स्ट्रोकची भीती राहत नही.

27

मोसंबीत मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळे पचन व्यवस्था चांगली राहते. शरीरातले विषारी घटक निघून जातात. लूज मोशन्स, उलट्या, मळमळ होत असेल तर, शरीराची ताकद वाढवण्यासाठी मोसंबीचा रस सर्वोतत्तम पर्याय असू शकतो.

37

हिरड्यांचे आजार असतील तर, मोसंबीचा रस प्यावा. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांना सूज येणं, वारंवार सर्दी होणं, तोंडात किंवा जीभेवर रॅशेस येणं हे त्रास होतात. तेव्हा मोसंबीच्या रसामध्ये काळं मीठ मिसळून हिरड्यांवर लावल्याने रक्तस्त्राव संपतो. तोंडाला खराब वास येत असेल तर, याचा वापर करा.

47

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा रस प्यावा. मोसंबीमध्ये कॅन्सररोधी, अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट, बॅक्टेरियाविरोधी आणि डिटोक्सिफायिंग गुणधर्म आहेत. संसर्गाशी लढण्यास मदत करतं आणि अल्सरमध्ये फायदेशीर आहे. रक्ताभिसरण सुधारतं आणि प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतं.

57

मोसंबीतील अ‍ॅन्टीसेप्टिक आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्मांमुळे त्वचेला फायदा होतो. केस आणि त्वचा चांगली राखण्यासाठी मोसंबीचा सर प्यावा. यातील व्हिटॅमिन्स केसांना मजबूत बनवतात आणि डोक्यातील कोंडा, तुटणाऱ्या केसांची समस्या दूर होते.

67

यात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरात दाह कमी होतो. त्यामुळेच ऑस्टियोआर्थराइटिस आणि संधीवाताच्या उपचारात महत्वाची भूमिका बजावतं. कॅल्शियमचं शोषण वाढवतं आणि हाडांच्या निर्मितीसाठी पेशींना उत्तेजित करतं.

77

डोळे चांगलं ठेवायचे असतील तर, मोरंबीचा रस प्यावा. यात अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे मोतीबिंदू आणि डोळ्यासंदर्भातले आजार होत नाही.

  • FIRST PUBLISHED :