NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / छोटीशी बी इतकी फायदेशीर; टाकून देऊ नका, भाजीपेक्षा मिळतील जास्त न्यूट्रिशन्स

छोटीशी बी इतकी फायदेशीर; टाकून देऊ नका, भाजीपेक्षा मिळतील जास्त न्यूट्रिशन्स

भोपळ्याच्या बियांचे फायदे माहिती झाले तर तुम्ही स्वतः त्या विकत आणून खायला सुरुवात कराल. भोपळ्याची बी दिसायला छोटी असते मात्र, या छोट्या बीपासून जास्त प्रमाणात न्यूट्रिशन मिळतात.

18

दररोज सकाळच्या नाश्त्यामध्ये 1 चमचा भोपळ्याच्या बिया म्हणजेच मगज खाव्यात. यात हेल्दी फॅट, हाय फायबर देखील असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन के, प्रोटीन, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमीन बी आणि ऍन्टीऑक्सिडंट असतात.

28

भोपळ्याच्या बिया म्हणजेच मगजमध्ये मॅग्नेशियम,कॉपर, झिंक आणि फॉस्फरस असतं. ज्यामुळे ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये येतं. यामधील मिनरल्समुळे रक्तामधील मिठाची पातळी नियंत्रणात राहते. ज्यामुळे ब्लडप्रेशर वाढत नाही.

38

भोपळ्याच्या बियांमध्ये इन्सुलिनवर नियंत्रण आणण्याची क्षमता असते. त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते. अन्नाचं पचन हळूहळू व्हायला लागल्यामुळे शरीरात साखर वाढण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळेच शरीरात इन्सुलिन निर्माण होण्यासाठी भरपूर वेळ मिळतो.

48

लाल भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपलं पोट भरलेलं वाटत राहतं. त्यामुळे सतत भूक लागत नाही भूक न लागल्याने आपण जास्त जेवण घेत नाही आणि वजन कमी राहतं.

58

इम्युनिटी वाढवायची असेल तर, मगज खा. यामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक असतं. त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली होते. सर्दी, खोकला व्हायरल इन्फेक्शन लवकर होत असेल तर, त्यापासून आपला बचाव होतो.

68

भोपळ्याच्या बियांमुळे शरीरात मेटाबॉलिजम वाढतं. या बिया पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. या बिया रोज खाल्ल्या तर, पचनासंबंधीच्या समस्या दूर होतात.

78

लाल भोपळ्याच्या बियांमध्ये ऍन्टीऑक्सीडंटची मात्रा ही खूप जास्त असते. दररोज लाल भोपळ्याच्या बिया खा. यामुळे एजिंगची समस्याही कमी होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

88

भोपळ्याच्या बिया खाण्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो. शिवाय ब्लडप्रेशर नियंत्रणात येतं. त्यामुळे हृदयासंबंधी काही आजार असतील तर, आपल्या आहारामध्ये या बियांचा समावेश करा.

  • FIRST PUBLISHED :