जेवणानंतर फळं खायला कुणाला आवडत नाही. ऑफिस किंवा घरात देखील लोक जेवल्यावर फळं खातात. पण, सगळीचं फळ जेवणानंतर खाणं चांगलं नसतं.
डॉक्टर किंवा आयर्वेदाचार्यही जवणानंतर काही फळं खाणं टाळायला सांगतात. तर, काही आंबट चवीची फळ सोडली तर,बाकीची फळं रिकाम्यापोटी खाणं चांगलं असतं.
आंबा आपण आवडीने खातो. काहीजण जेवणाबरोबर किंवा नंतर आंबा खातात. पण, आंबा प्रकृतिने गरम आहे. त्यामुळे जेवणानंतर 1 तासाने खावा. डायबेटिजच्या रूग्णांनी आंबा खाणं टाळावं.
जवल्यावर केळं खायला आवडत असेल तर, टाळा. कारणं केळ्याने आपल्या शरीरात ग्लुकोज वाढतं. आधीच जेवल्यामुळे शरीरात कॅलरीज आणि ग्लूकोज वाढतं त्यात केळ खाऊ नये.
कलिंगड जेवल्यावर खायला आवत असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाऊ नये.
द्राक्षांमध्ये शरीरातील पाण्याची मात्रा वाढते. त्यामुळे जेवणानंतर लगेच द्राक्ष खाऊ नये.
मोसंबीमध्ये जास्त प्रमाणात ग्लुकोज असतं. त्यामुळे एनर्जी वाढते म्हणून दुपारी खावं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशन कमी होतं.
संत्री 1 तास जेवणाधी खावीत किंवा जेवणानंतर 1 तासाने. यात भरपूर व्हिटॅमीन सी असतं.