NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / वैतागू नका, घाम येणं आहे चांगलं! आरोग्यासाठी मिळतात अविश्वासनीय फायदे

वैतागू नका, घाम येणं आहे चांगलं! आरोग्यासाठी मिळतात अविश्वासनीय फायदे

घामाच्या वासामुळे चारचौघात लाज वाटते. अंगाला येणारा चिकचिक घाम नकोसा वाटला तरी, त्याचेही अनेक फायदे (Benefits Of Sweating) आहेत.

19

घामाला येणाऱ्या वासांमुळे शरीरातून घाम बाहेर आला नाही तर बरं होईल असं बर्‍याच जणांना वाटतं. घामाच्या दुर्घंदीमुळे लाज वाटत असली तरी घाम येणं चांगलं असतं.

29

काहींना बाराही महिने घाम येतो. तर, काहींना अगदी कमी घाम येतो. घामाच्या वासामुळे,बर्‍याच वेळा लोकांबरोबर वावरताना लाज वाचते. पण अंगाला घाम येणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

39

आवडत नसलं तरी, घाम येणं आरोग्यासाठी चांगलं आहे. घामामुळे शरीर डिटॉक्सिफाय होतं, म्हणजेच घामाने शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर पडतात. घाम फुटल्याने शरीर थंड राहतं.

49

शरीरात अनेक प्रकारचे रसायनिक पदार्थ असतात जे आरोग्यावर वाईट परिणाम करतात. घामामुळे शरीरातून रसायनिक पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळे आरोग्याच्या समस्या कमी होतात.

59

घामामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. त्यामुळे त्वचेची चमक वाढते. घाम निघून गेल्यावर त्वचा कोमल बनते.

69

घामामुळे कॅलरी बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण, कॅलरी बर्न करण्यासाठी जास्त घाम यावा लागतो. यासाठी एक्सरसाईज किंवा जड काम करावं लागतं.

79

घाम येण्याने तणावातून आराम मिळतो. स्ट्रेस वाढला असेल तर, व्यायाम करावा. त्यामुळे शरीरावर घाम येतो. घामामुळे शरीराची उष्णता कमी होते,ज्यामुळे तणाव कमी होण्यात मदत होते.

89

कोणत्याही कामाशिवाय आणि व्यायामाशिवाय जास्त घाम येणे हृदयविकाराच्या समस्येचं सुरवातीचं लक्षण असू शकतं. रक्त ब्लॉक केलेल्या धमन्यांमधून हृदयात पंप करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. यामुळे ताणतणावामुळे शरीराचं तापमान नॉर्मल राहण्यासाठी जास्त घाम येतो.

99

बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे अति घाम येऊ शकतो. हृदयाच्या झडपांमध्ये सूज आल्याने किंवा हाडांशी संबंधित संक्रमण असल्यासही घाम येतो. अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

  • FIRST PUBLISHED :