NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तुम्ही शाकाहारी समजून मांसाहारी पदार्थ तर खात नाही ना ? बघा यादी

तुम्ही शाकाहारी समजून मांसाहारी पदार्थ तर खात नाही ना ? बघा यादी

बाजारात मिळणारे बटाटा वेफर्स, केळी आणि खारे शेंगदाणेसुद्धा शाकाहारी (Vegetarian) नसतात. आता श्रावण महिना सुरू होतील. त्यामुळे बाजारामध्ये पदार्थ विकत घेताना जरूर काळजी घ्यायला हवी.

111

काही पदार्थ आपण शाकाहारी समजून खात असतो मात्र, हे पदार्थ पूर्णपणे शाकाहारी नसतात. काही पदार्थांमध्ये ॲनिमल प्रॉडक्ट वापरलेले असतात. त्यामुळे हे पदार्थ विकत घेताना त्यांच्यावरचं लेबल पाहून घ्यावं.

211

चीज - बऱ्याच लोकांना ब्रेकफास्ट, स्नॅक्स मध्येच चीज वापरायची सवय असते. खरंतर लहान मुलांना चीज सगळ्यात जास्त आवडतं. चीजमध्ये रेन्नेट मिसळलेलं असतं. हे एक प्रकारचं एंजाइम आहे जे वासरांच्या पोटा मधून मिळतं. चीज घट्ट करण्यासाठी हे वापरलं जातं. बाजारामध्ये शाकाहारी चीज देखील मिळतं ज्यामध्ये रेन्नेट वापरलेलं नसतं. त्यामुळे चीज घेताना त्यावर लेबल तपासून घ्या.

311

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असणारे प्रॉडक्ट काही पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड नसतं मात्र, तरीदेखील त्यात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड घालून त्यांना बाजारामध्ये विकलं जातं. असे पदार्थ शाकाहारी नसतात. यांच्यामध्ये माशांमधून मिळणारे ऑईल वापरलं जातं. आळशी, सब्जा आणि अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड नैसर्गिकरीत्या आढळतं.

411

सॉफ्ट ड्रिंक - सॉफ्ट ड्रिंक बनवताना त्यामध्ये जिलेटिन वापरलं जात. यामुळे पदार्थाला घट्टपणा येतो. मात्र, जिलेटीन हा जनावरांच्या शरीरामधून प्राप्त होणारा पदार्थ आहे. सगळ्याच सॉफ्ट ड्रिंकमध्ये जिलेटीन वापरलं जात नसलं तरीदेखील सॉफ्टवेअर खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या

511

साखर - साखर सफेद बनवण्यासाठी त्यासाठी ‘बोन चार’ किंवा नॅचरल कार्बन वापरून ब्लिचिंग केलं जातं. यासाठी प्राण्यांच्या हाडांपासून मिळणाऱ्या भुकटीचा वापर केला जातो. कन्फेक्शनर आणि ब्राऊन शुगरमध्ये सुद्धा हेच वापरलं जातं.

611

व्हॅनिला आईस्क्रीम - व्हॅनिला आईस्क्रीममध्ये फ्लेवर येण्यासाठी जनावरांच्या शरीरातून मिळणारे काही पदार्थ वापरले जातात. यालाच केस्टोरम म्हटलं जातं. फ्लेवरसाठी व्हॅनिला आईस्क्रीममध्ये केस्टोरम वापरलं जातं. केस्टोरम खाल्ल्यामुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नसलं तरी अशाप्रकारे बनवलेलं व्हॅनिला आइस्क्रीम मांसाहारी असतं.

711

नॉन ऑरगॅनिक केळी - नॉन ऑरगॅनिक केळ्यांमध्ये झिंगा आणि खेकडे यांचा वापर केला जातो. झिंगा आणि खेकड्यांमध्ये आढळणाऱ्या पदार्थांमध्ये बॅक्टेरियाविरुद्ध लढण्याची क्षमता असते. ज्यामुळे केळ्यांचं प्रिजर्वेशन होतं. म्हणूनच केळी लवकर खराब होऊ नयेत याकरता हे वापरलं जातं. त्यामुळे उपवासाकरता केळी खरेदी करताना ती पूर्णपणे ऑरगॅनिक असल्याची खात्री करून घ्या.

811

खारे शेंगदाणे - काही ब्रांडेड कंपन्यांचे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी आणि मसाल्याबरोबर जिलेटिन वापरतात. जिलेटिन जनावरांच्या हाडांपासून तयार होतं. त्यामुळे अशाप्रकारे बाजारात मिळणारे खारे शेंगदाणे हे शाकाहारी नसतात.

911

बार्बेक्यु फ्लेवर बटाटा वेफर्स - बाजारा मध्ये मिळणारे बार्बेक्यु बटाटा फ्लेवर चिप्स पूर्णपणे शाकाहारी नसतात. यामध्ये चिकन फॅट वापरलं जात. त्यामुळेच अशा प्रकारचे चिप्स खरेदी करताना त्यावरचं लेबल तपासून घ्या.

1011

व्हेजिटेबल सुप - मार्केटमध्ये मिळणाऱ्या व्हेजिटेबल सुपमध्ये चिकन किंवा बीफच्या हाडांपासून मिळणारे पदार्थ वापरले जातात. त्यामुळेच हे सूप व्हेजिटेबल सूप म्हणून खरेदी करत असाल तरी, देखील त्यावरचं लेबल वाचा. बाजारामधून व्हेजिटेबल सूप खरेदी करण्यापेक्षा घरच्याघरी करा.

1111

हार्ड कोटेड कॅन्डीज - हार्ड कोटेड कॅन्डीजमध्ये शेलॅक वापरलं जातं. जे एका किड्याच्या स्त्रावांमधून तयार होतं. शेलॅकचा वापर फर्निचर पॉलिश, हेअर स्प्रे आणि कृषी उत्पादनांमध्ये केला जातो. हार्ट कॉटेड कॅन्डीज पॅकिंगवर असा उल्लेख असेल तर खरेदी करू नका.

  • FIRST PUBLISHED :