NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Ganesh Chaturthi: यंदा नातेवाईकांसोबत करा गणरायाचं स्वागत; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका

Ganesh Chaturthi: यंदा नातेवाईकांसोबत करा गणरायाचं स्वागत; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका

Ganeshotsav Invitation in Marathi: गणपती बाप्पा आपल्या सर्वांचं लाडकं दैवत! बुधवारी, 31 ऑगस्ट,2022 रोजी, गणरायाचं आगमन होणार आहे. या शुभदिनी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमैत्रिणींना आमंत्रित करू शकता.त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला सुंदर निमंत्रण पत्रिका ठेवू शकता.

15

सस्नेह निमंत्रण..! आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, यंदाही आमच्या घरी श्रीगणेश चतुर्थीला बुधवार, दिनांक - 31/8/2022 रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा. आपले नम्र, ठिकाण :

25

सस्नेह निमंत्रण..! llश्रीगणेशाय नम:ll सालाबादाप्रमाणे यंदाही बाप्पाचं आगमन आमच्या घरी दि. 31/8/2022 होत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आप्तेष्टांसोबत आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे, ही नम्र विनंती. पत्ता:- आम्ही आपली वाट पाहत आहोत.

35

सस्नेह निमंत्रण..! गणपती आमंत्रण पत्रिका । कोरोनाचे विघ्न दूर हारूनी यंदा पुन्हा बाप्पाचा जयघोष करूया..! आमच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की या ! पत्ता - आरतीची वेळ -

45

सस्नेह निमंत्रण..! सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या कडे 31 ऑगस्टला गणरायाचं आणि 3 सप्टेंबरला गौराईचं आगमन होणार आहे. तरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की यावं हे आग्रहाचं आमंत्रण ! गौरी पूजन - तारीख : 31 ऑगस्ट, 2022 वेळ: सकाळी 10 वाजल्यापासून पत्ता-

55

गणेशोत्सव 2022 आग्रहाचं आमंत्रण..! सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या घरी बुधवार, दिनांक 31/8/2022 या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा!

  • FIRST PUBLISHED :