पल्स ऑक्सिमीटर : कोरोना संसर्गाची लागण झाली तर ऑक्सिजन लेव्हलचे निरीक्षण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. कोविड रुग्णामध्ये ऑक्सिजनच्या पातळीत झपाट्याने चढ-उतार होतो. ऑक्सिजनची पातळी खूप कमी झाल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. रुग्णाला तातडीने ऑक्सिजन द्यावा लागतो. म्हणूनच घरात पल्स ऑक्सिमीटर ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून कोविड रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास त्याला रुग्णालयात नेण्यास विलंब होणार नाही.
थर्मामीटर: घरात इन्फ्रारेड थर्मामीटर असणे आवश्यक आहे. कारण कोरोना रुग्णाला स्पर्श न करता शरीराचे तापमान घेऊ शकते. तो थोडा महाग येतो. म्हणूनच घरामध्ये सामान्य थर्मामीटर किंवा डिजिटल थर्मामीटर ठेवणे आवश्यक आहे. ताप हे कोविड 19 च्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. म्हणूनच कोविड रुग्णाच्या तापाची तपासणी करत राहणे अत्यंत आवश्यक आहे.
स्टीमर किंवा नेब्युलायझर: श्वसनमार्गामध्ये कंजेशन हे कोविड 19 चे सामान्य लक्षण आहे. कोविड रुग्णाला वेळेवर स्टीम देऊन सर्दी आणि खोकल्याची लक्षणे नियंत्रित करता येतात. छातीतील रक्तसंचय कमी होऊ शकतो. श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी स्टीमर आणि नेब्युलायझर खूप महत्वाचे आहेत.
ब्लड प्रेशर मॉनिटर: जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत राहत असाल ज्याला रक्तदाबाची समस्या आहे, तर घरी रक्तदाब मॉनिटर ठेवणे आवश्यक आहे. डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटरच्या साह्याने रुग्णाच्या पल्स रेटचेही निरीक्षण करता येते. अनेक रुग्णांना कोविड झाल्यावर घाबरू लागते, अशावेळी त्यांचा रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतात. अशा परिस्थितीत, रक्तदाब निरीक्षण करणे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
याशिवाय मास्क, सॅनिटायझर, हातमोजे घरी ठेवा. घरातील एखाद्याला सर्दी किंवा ताप असल्यास त्यांना क्वारंटाइन करा किंवा मास्क आणि हातमोजे लावल्यानंतरच त्यांच्या संपर्कात या. घरातील लादी सॅनिटायझरने स्वच्छ करत रहा.