उन्हाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे ज्युस आलेच. तुम्ही आजवर फळांचे, भाज्यांचे ज्युस प्यायलात असाल. पण काही देशातील लोक असे ज्युस पितात, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
मंगोलयात मेंढ्यांच्या डोळ्यांच्या बाहुली टोमॅटो ज्युसमध्ये टाकून पितात. यामुळे दारूची नशा कमी होते, असं म्हणतात. या ज्युसमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि ए असल्याचं सांगितलं जातं.
दक्षिण कोरियात टोंगसुल हे ट्रेडिशन मेडिकल ड्रिंक्स आहे. यासाठी 4-7 वयोगटातील मुलांची पॉटी 3-4 दिवस फ्रिजमध्ये ठेवून पाणी टाकून फर्मेंट करतात. त्यातून दुर्गंधी आल्यावर भातासोबत मिसळून खातात. या ड्रिंकमुळे मोडलेली हाडं, शारीरिक वेदना, शरीराची जळजळपासून आराम मिळतो, असा दावा केला जातो.
पेरूत फ्रॉग ज्युस खूप प्रसिद्ध आहे. बेडकांना मारून त्यांना पाण्यात मिक्स केलं जातं. यात वेगवेगळे मसाले, हर्ब्स, मध मिसळलं जातं.
यूएसच्या मायक्रोनेशियात गुआममधील वटवाघळांचं सूप आवडीने पितात. हे शिजवताना लघवीसारखा वास येतो, यांचं मांस चिकनसारखं लागतं असं म्हणतात. या सूपमुळे अनेक आजारही झाल्याची माहिती आहे, तरी लोक ते पितात.
चीनमध्ये उंदरांच्या पिल्लांपासून वाईन बनवतात. ज्या पिल्लांचे डोळे उघडले नाही, त्यांच्या शरीरावर केस नाहीत अशा पिल्लांना तांदळापासून बनवलेल्या वाईनमध्ये बुडवतात. एक वर्षानंतर हे ड्रिंक पितात. यामुळे अस्थमा, लिव्हरच्या आजारापासून आराम मिळत असल्याचा दावा केला जातो.