NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Beed News: तब्येत ठणठणीत ठेवणारी तिरंगा थाळी! बीडमध्ये झाली चांगलीच फेमस, Photos

Beed News: तब्येत ठणठणीत ठेवणारी तिरंगा थाळी! बीडमध्ये झाली चांगलीच फेमस, Photos

बीड कृषी प्रदर्शनात तिरंगा थाळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या थाळीच्या माध्यमातून महिलांना सकस आहाराबद्दल माहिती दिली जात आहे.

  • -MIN READ

    Last Updated: February 27, 2023, 12:18 IST
19

बीडमध्ये पाच दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सव सुरू आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेला कृषी महोत्सव 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

29

या कृषी महोत्सवामध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

39

यातील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे एक स्टॉल लावण्यात आला आहे. सकस आहारांविषयीचा तिरंगा थाळीचा स्टॉल लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

49

आर्थिक विकास मंडळातर्फे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक महिलांमध्ये ॲनेमिया असल्याचे आढळले.

59

सकस आहाराच्या अभावाने महिलांमध्ये अशक्तपणा जाणवतो. त्यासाठी महिलांनी आहारात कडधान्ये आणि फळांचे सेवन करावे हे तिरंगा थाळीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

69

या थाळीमध्ये मटकी, गावरान चने, नाचणीचा पापड, दूध, दही, फ्रुट सलाड, बाजरी भाकरी, ज्वारीची भाकरी, काजू, बदाम, गाजराचा हलवा, शेंगदाण्याचे लाडू यासारखे पदार्थ आहेत.

79

तसेच तिरंगा थाळीत द्राक्षांसह विविध फळे आहेत. शरीराला पोषक व अधिक विटामिन सत्त्व असणारी कडधान्ये, खाद्यपदार्थ या तिरंगा थाळीमध्ये आहेत.

89

पोषक आणि सात्विक पदार्थ थाळीत ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ही तिरंगा थाळी दिसायलाही आकर्षक वाटत आहे.

99

कृषी प्रदर्शनात आलेले लोक या ठिकाणी भेट देत आहेत. तसेच तिरंगा थाळीबद्दल माहिती घेत आहेत.

  • FIRST PUBLISHED :