उन्हाळा म्हटलं की कलिंगड आलं. अगदी 20 रुपयांपासून कलिंगड मिळतं. पण एक असं कलिंगड ज्याची किंमत तब्बल 4.5 लाख रुपये आहे.
डेनसूक वॉटरमेलन, ज्याचा बाहेरून रंग काळा असतो म्हणून त्याला ब्लॅक वॉटरमेलन असंही म्हणतात.
चव, बिया, तसंच बाहेरचा भाग वैशिष्ट्यपूर्ण असल्याने हे कलिंग अन्य कलिंगडांच्या तुलनेत वेगळं ठरतं.
या कलिंगडाचं उत्पादन जेमतेमच होतं. एक वर्षात सुमारे 100 कलिंगडांचं उत्पादन होतं. त्यामुळे हे कलिंगड दुर्मिळ मानलं जातं.
खाण्यासोबतच हे कलिंगड गिफ्टही केलं जातं. महाग असल्याने हाय प्रोफाइल सेलेब्रिटीजना गिफ्ट म्हणून हे कलिंगड दिलं जातं.
अन्य कलिंगडांप्रमाणे बाजारात याची विक्री केली जात नाही. या खास कलिंगडासाठी बोली लावली जाते. 2019 मध्ये एका ब्लॅक वॉटरमेलनची तब्बल 4.5 लाख रुपयांना विक्री झाली होती.
हे एक जपानी कलिंगड आहे. होकाइडो आयलंडच्या उत्तर भागात या कलिंगडाचं उत्पादन होतं. जपान हे कलिंगड अन्य देशांना निर्यातदेखील करतं. (सर्व फोटो सौजन्य - ट्विटर)