NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / पुणेकर हा वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही, असं आहे तरी काय? PHOTOS

पुणेकर हा वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही, असं आहे तरी काय? PHOTOS

पुण्यातील कोथरुडमध्ये गेल्या 30 वर्षांपासून हा स्टॉल फेमस असून इथं वडापावसाठी चक्क रांग लागलेली असते.

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
    Last Updated: July 27, 2023, 20:36 IST
16

मुंबईसह राज्यातील सर्वच शहरात वडापाव हे फेमस फास्ट फुड आहे. झटपट तयार होणारा, खाण्यासाठी कमी वेळ लागणारा तरीही अतिशय लज्जतदार असा हा पदार्थ आहे.

26

पुणे शहरातील अनेक वडापाव स्टॉल चांगलेच फेमस आहेत. या स्टॉलवर नेहमी गर्दी असते. पुण्यातील कोथरुडमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काका वडेवाल्यांचा स्टॉल फेमस असून येथील वडापाव खाण्यासाठी चक्क रांग लागलेली असते.

36

कोथरुड परिसरातील शिवतीर्थ नगर आणि गुजरात कॉलनी या परिसरात नामदेव कुंभार यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला. आता वडिलांच्या वयामुळे नामदेव आणि त्याचा भाऊ हा व्यवसाय सांभाळतात.

46

गेल्या 30 वर्षापासून आजतागायत आमच्या वडापावची चव आबादीत आहे. त्यामुळे आवर्जून लोक इथे वडापाव खायला येतात.आमच्याकडं वडापाव खाण्यासाठी ग्राहक रांगेत उभे असतात, अशी माहिती नामदेव कुंभार यांनी दिली.

56

वडयाचा एक घाणा काढला की तो चक्क पाच ते दहा मिनिटांमध्ये कमीत कमी 40 ते 50 वडे आमचे लगेचच संपतात. आमच्या वड्याची खासीयत तशी आहे की आमच्या वड्यांमध्ये सुरुवातीला थोडासा गोडसर लागणारा वडा हळू तिखट लागत जातो. आणि त्याच्या कुरकुरीतपणामुळे हा वडापाव अतिशय टेस्टी असतो, असे कुंभार यांनी स्पष्ट केलं.

66

हा वडापाव पॉकेट फ्रेंडली असून 15 रुपयांना मिळतो. त्यामुळे कॉलेजच्या तरुणांची इथं मोठी गर्दी असते.सोमवार ते शनिवार दुपारी एक ते रात्री साडेनऊपर्यंत काका वडेवाले यांचा स्टॉल सुरू असतो. रविवारी त्यांना सुटी असते.

  • FIRST PUBLISHED :