NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / नाश्त्यासाठी पौष्टिक थालीपीठ कसं बनवाल? पाहा सोपी पद्धत PHOTOS

नाश्त्यासाठी पौष्टिक थालीपीठ कसं बनवाल? पाहा सोपी पद्धत PHOTOS

रोज नाश्त्यामध्ये तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आलाय तर एकदा अस्सल गावरान पद्धतीचं थालपीठ ट्राय करा.

  • -MIN READ

    Last Updated: July 23, 2023, 09:56 IST
16

थालपीठ हा पश्चिम भारत आणि उत्तर कर्नाटकातील लोकप्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारीचे पीठ आणि बेसनापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले जाते. चविला स्वादिष्ट असणारे थालीपीठ कोणत्याही चटणी किंवा करीशिवाय सर्व्ह केले जाऊ शकते. परंतु लोणी आणि दह्याबरोबर छान लागते. बीड मधीलगृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून आपण थालीपीठची रेसिपी जाणून घेणार आहोत.

26

सध्याचा काळ हा फास्टफूडचा मानला जातो. अनेकजण नाश्त्यातही तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळलेले असतात. त्यांच्यासाठी अस्सल गावरान आणि पारंपरिक असणारे थालीपीठ एक चांगला पर्याय आहे. स्वादिष्ट आणि बनवायला सोपी असणारी थालीपीठाची रेसिपी आपण घरात सहज बनवू शकतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा पदार्थ पोषक आहे.

36

गव्हाचे, ज्वारीचे व बाजरीचे असे प्रत्येकी 1 वाटी पीठ, थोडेसे बेसन, 1 चमचा धना पावडर, हळद, लाल तिखट (आपल्याला ज्याप्रमाणात तिखट हवे आहे तेवढे घ्यावे), मीठ चवीनुसार, यानंतर साधारण 1 वाटी भरून बारीक चिरलेला कांदा आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.

46

थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम वरील प्रमाणे सर्व प्रकारचे पीठ एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्या. त्यानंतर त्या एकत्रित केलेल्या पिठात बारीक चिरलेला कांदा, धना पावडर, हळद, लाल तिखट व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या.

56

त्यानंतर अंदाजाने पाणी घालून हे मिश्रण मळून घ्या. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही असे मध्यम स्वरूपात हे मळून घ्या. त्यानंतर हे पिठाचा गोळा हातावर घ्यावा व हातावर काही प्रमाणात तेल आणि थोडे पाणी लावावे.

66

त्यानंतर तवा हलक्या प्रमाणात गरम झाल्यावर त्यावर थोडेसे तेल सोडावे व त्या तव्यावरच हे थालपीठ माखून घ्यावे. त्यानंतर 5 ते 7 मिनिट या थालपीठाला वाफू द्यावे आणि त्यानंतर दही ठेचा बरोबर गरमागरम थालपीठ खाऊ शकता. थालीपीठची ही रेसिपी सोपी असून आपण नक्की ट्राय करू शकता.

  • FIRST PUBLISHED :