भारतामध्ये खाद्यसंस्कृतीही विविधतेने नटलेली आहे. मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये देशभरातील चविष्ट पदार्थांची चव काही रेस्टॉरंटमध्ये चाखता येते. उपवासाच्या आणि चातुर्मासाच्या काळात जर तुम्हांला मांसाहार करणं निषिद्ध असेल तर अशाकाळात चटकदार काय खावे या प्रश्न पडणाऱ्यांसाठी या रेस्टॉरंटमधील खवय्येगिरी फायद्याची ठरणार आहे. नेहमी पेक्षा थोड्या हटके चवीची तुम्हांला लज्जत लुटायची असेल तर रेस्टॉरंटला नक्की भेट भेट द्या.
1) भगत ताराचंद : शाकाहारी थाळीसाठी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंटपैकी एक म्हणजे भगत ताराचंद. स्पेशली विविध प्रकारच्या शाकाहारी थाळी आणि गुजराती थाळीसाठी हे रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे.
2) तंत्रा रेस्टॉरंट : ह्युजेस रोडवरील तंत्रा या रेस्टॉरंटमध्ये दिले जाणारे शाकाहारी उत्तर भारतीय आणि मुघलाई जेवण सुप्रसिद्ध आहे.
3) बर्मा बर्मा : भारतीय खाद्य संस्कृती प्रमाणेच काही परदेशी अस्सल शाकाहारी पदार्थांची चवही उत्तम आहे. यामध्ये तुम्ही काही आशियन आणि बर्मी पदार्थांचा आनंद घेऊ शकता. या रेस्ट्रॉरंटचा लूक म्यानमार (रंगून) प्रमाणे ठेवण्यात आला आहे. येथे फालुदा, सामोसा सूप, नूडल्स, सलाड, यांचा आनंद घेऊ शकता . हे रेस्ट्रॉरंट कोठारी हाउस, अलाना सेंटर लेन, एमजी रोड, फोर्ट इथे आहे.
4) ओये काके : ओये काके तुम्हाला संपूर्ण पंजाबी, अमृतसरी आणि उत्तर भारतातील छोले भटुरे आणि विविध प्रकारची चवदार लस्सी सारखे सर्व स्वादिष्ट पदार्थ पुरवते. मुंबईच्या फोर्ट परिसरात कावासजी पटेल स्ट्रीट मुंबई इथे आहे.
5 ) श्री ठाकर भोजनालय : श्री ठाकर भोजनालय हे खरे गुजराती रेस्टॉरंट आहे जे राज्यातील सर्वोत्कृष्ट पाककृती देते, त्यांचा मस्त आमरस, तिखट आंब्याची कढी, स्वादिष्ट पुरण पोळी आणि पौष्टिक गुजराती थाळी चुकवू नये.