NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Photos : नाशिकमध्ये मिळतं तब्बल दीड लाखांचं पान! एकाच ठिकाणी आहेत 600 ऑप्शन

Photos : नाशिकमध्ये मिळतं तब्बल दीड लाखांचं पान! एकाच ठिकाणी आहेत 600 ऑप्शन

Nashik News : दुकानात एक-दोन नव्हे तर तब्बल 600 पेक्षा अधिक प्रकारचे पान बनतात. त्यामधील एका पानाची किंमत तब्बल दीड लाख आहे.

110

पान खाण्याचा शौक असलेली दर्दी मंडळी नित्यनेमाने एखाद्या दुकानात जाऊन पानाचा आस्वाद घेत असतात.

210

नाशिकमध्ये 'माऊली फॅमिली पान हाऊस' हे पानाचं दुकान प्रसिद्ध आहे. या दुकानात एक-दोन नव्हे तर तब्बल 600 पेक्षा अधिक प्रकारचे पान बनतात.

310

नाशिककरचं नाही तर बाहेरून येणारे पर्यटक देखील इथं पान खाण्यासाठी गर्दी करतात.

410

गणेश डुकरे या तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे फॅमिली पान हाऊस सुरू केलं आहे.

510

गणेशने मसाला पानाचा अभ्यास करून विविध प्रकारचे फ्लेवर तयार केले आहेत.

610

600 पेक्षा अधिक प्रकारचे पानांचे फ्लेवर गणेशकडे आहेत. अगदी 30 रुपयांपासून तर दीड लाख रुपयांपर्यंत पान त्याच्याकडे मिळते.

710

चंदन मसाला पान, नवाबी पान, चीज चॉकलेट पान, खसखस स्पेशल पान, राजधानी एक्सप्रेस पान, रजनीकांत पान, महफिल पान, नाईट कविन पान, मुमताज स्पेशल पान हे प्रकार इथं मिळतात.

810

माऊली फॅमिली पान हाऊसमध्ये तब्बल दीड लाख रुपयांचे पेशवाई गोल्ड पान मिळते. या पानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

910

ज्या वस्तू शरीरासाठी गुणकारक आहेत. अशा 18 आयुर्वेदिक वस्तूंपासून हे पान बनवलं जातं.

1010

नाशिक शहरापासून साधारणत: 10 किलोमीटर अंतरावर मखमलाबाद दरी-मातोरी रोडला माऊली फॅमिली पान हाऊस आहे.

  • FIRST PUBLISHED :