NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तुम्हाला माहिती आहे का 'हे' पदार्थ कधीच होत नाहीत खराब? वर्षानुवर्षे तुम्ही खाऊ शकता

तुम्हाला माहिती आहे का 'हे' पदार्थ कधीच होत नाहीत खराब? वर्षानुवर्षे तुम्ही खाऊ शकता

काही पदार्थ नीट साठवल्यास ते खराब होत नाहीत.

16

तुम्ही कोणतीही वस्तू घेतली तर त्याच्यावर उत्पादन आणि एक्सपायरी डेट लिहिलेली असते. म्हणजे या कालावधीनंतर या पदार्थांमध्ये पोषक घटक राहत नाहीत ते खराब होऊ लागतात. मात्र असे काही पदार्थ आहेत जे वर्षानुवर्षे खराब होत नाहीत. नीट साठवण केल्यास तुम्ही ते खाऊ शकता.

26

पांढरा तांदूळ - अमेरिकेतील उटाह स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासानुसार हवाबंद डब्यात आणि 40 डिग्री फॅरनहाइड तापमानावर असल्यास तांदळातील पोषण घटकाचं प्रमाण 30 वर्षांपर्यंत कमी होत नाही.

36

मध - आरोग्यासाठी चांगलं मानलं जाणारं मधही कधीच खराब होत नाही. फुलांच्या रसापासून मध तयार होत असताना मध्यमाशांच्या एन्झाइम्सशी प्रतिक्रिया करतं. मध जर काचेच्या बरणीत नीट बंद करून ठेवलं तर ते कधी खराब होत नाही.

46

मीठ - मीठ म्हणजे सोडियम क्लोराइडही कधी एक्सपायर होत नाही. त्यामुळेच साठवणीच्या पदार्थांमध्ये भरपूर मीठ वापरतात. मिठामुळे पदार्थांमधील आर्द्रता कमी होते आणि त्यांचा टिकण्याचा कालावधी वाढतो. मात्र मिठात जर आयोडिन मिसळलं तर ते पाच वर्षांपर्यंत टिकतं.

56

साखर - मिठाप्रमाणेच साखरही जाम-जेलीसारख्या अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. मात्र साखर जर पावडर स्वरूपात असेल तर ती खराब होऊ शकते. त्यामुळेच पिठीसाखर हवाबंद डब्यात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

66

राजमा - एका अभ्यासानुसार राजमा, सोया हेदेखील 30 वर्षांआधी खराब होत नाहीत. शिवाय त्यातील पोषक घटकही कायम राहतात. (Photo-pixabay)

  • FIRST PUBLISHED :