NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / खूशखबर! कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा

खूशखबर! कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा

या थेरेपीमुळे रुग्णालयात दाखल न होताच कोरोना रुग्णांवर उपचार होतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

16

सध्या कोरोनाव्हायरसवर कोणताही प्रभावी उपचार नाही. उपलब्ध असलेल्या इतर आजारांवरील औषधं दिली जात आहेत, शिवाय लशीसाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. अशात आता अमेरिकेतच्या शास्त्रज्ञांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.

26

फ्लोरिडामधील एडवेंटहेल्थ रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी एक थेरेपी तयार केली आहे. कोरोनाव्हायरसवर ही थेरेपी 100 टक्के प्रभावी ठरेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

36

ICAM असं या थेरेपीचं नाव आहे. चार प्रकारचे औषध एकत्र करून एक थेरेपी तयार केली आहे. आज तकने fox35orlando.com रिपोर्टचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे.

46

हे नवं औषध नाही तर आधीपासून वापरात असलेल्या चार औषधांची एक थेरेपी तयार करण्यात आली आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंकसारखे इम्युनोसपोर्ट औषधं, कोर्टिकोस्टेरॉईड्स (Corticosteroids), अँटिकोगलंट्स (Anticoagulants) आणि मॅक्रोलाइड्स (Macrolides) यांचा समावेश आहे.

56

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या उद्देशाने ही थेरेपी तयार करण्यात आली आहे. हे औषध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवण्यासह फुफ्फुसाला येणाऱ्या सूजेपासूनही संरक्षण करेल.

66

सध्या याचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. ट्रायलदरम्यान जर ICAM थेरेपी सुरक्षित आणि प्रभावी ठरली तर रुग्णालयात दाखल न करतादेखील कोरोना रुग्णांवर उपचार करता येतील, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

  • FIRST PUBLISHED :