NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / शरीर सुडौल-फिट राखण्यासाठी रोजच्या आहारात फक्त इतका करा बदल

शरीर सुडौल-फिट राखण्यासाठी रोजच्या आहारात फक्त इतका करा बदल

Food to make body strong: परिपूर्ण आणि सुडौल शरीरासाठी लोक किती मेहनत घेतात. योगासनांपासून ते व्यायामापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. व्यायाम-योगासोबतच आहाराची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सकस आहाराने फक्त निरोगी लाईफच नाही तर सुंदर आणि सुडौल शरीरही मिळू शकते. शरीराचा आकार, रचना कशी आहे, हे देखील काही प्रमाणात चयापचयावर अवलंबून असते.

16

सुडौल शरीर मिळण्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे अंगावर चरबी जमा होणं. फिट आणि बोल्ड राहण्यासाठी चरबी शरीरावर चरबी वाढण्यापासून थांबवणे गरजेचे आहे. यासाठी अशा काही गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे, ज्यामुळे शरीर मजबूत होते, शरीर सुडौल राहते आणि चरबी वाढू देत नाही.

26

सुडौल शरीरासाठी या गोष्टी खा - ओट्स ईटिंग वेलच्या माहितीनुसार ओट्स अनेक प्रकारे बनवता येतात. ओट्सला सुपर फूड मानलं जातं. त्यात कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद असते. वैज्ञकीय तज्ज्ञांच्या मते ओट्समध्ये भरपूर फायबर असते. वजन कमी करण्यास त्याची मदत होऊ शकते. त्यामुळे आहारात ओट्सचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

36

सॅल्मन सॅल्मन मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अॅटॅक्सॅन्थिन घटकाने समृद्ध असलेल्या सॅल्मन माशांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी असल्याने हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे शरीर सुडौल होण्यास मदत होते.

46

ब्लूबेरी (करवंद) अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध ब्लूबेरी स्मूदी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. ब्लूबेरी खाल्ल्याने त्वचा तरुण राहते. तसेच यामध्ये असलेले फायबरचे प्रमाण शरीरातील चरबी वाढू देत नाही. आहारात ब्लूबेरीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

56

एवोकॅडो एवोकॅडो खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. तज्ज्ञांच्या मते, एवोकॅडो खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि पोटात साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते. ते खाल्ल्याने मधुमेहाचा धोकाही कमी होतो.

66

अक्रोड अक्रोडात कॅलरीज जास्त असतात तसेच त्यामध्ये पोषक तत्वही भरपूर असतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. जे वजन कमी करण्यास मदत करू शकतात. हे 5 पदार्थ शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी खूप मदत करू शकतात. आहारात घेत राहिल्यासा त्याचा नक्की तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसून येईल.

  • FIRST PUBLISHED :