NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / काम करण्याची इच्छा नाही? हा देश देईल फ्री घर, गाडी अन् बंगला, आरामात जगाल आयुष्य!

काम करण्याची इच्छा नाही? हा देश देईल फ्री घर, गाडी अन् बंगला, आरामात जगाल आयुष्य!

अनेकांना जगभर फिरणं आवडतं, बरेच जण नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक होतात, तर काही लोक दरवर्षी परदेशात फिरायला जातात. दुसऱ्या देशात राहायला जाणं, तिथं घर घेणं, हे अनेकांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी पैसेही खूप लागतात. पण जगातील काही ठिकाणी लोकांनी तिथं राहावं, यासाठी सरकार पैसे देतं. त्याचं कारण म्हणजे सातत्याने कमी होणारी लोकसंख्या होय. जगभरातील अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

15

व्हरमाँट हे अमेरिकेतील एक पर्वतीय राज्य आहे. हे राज्य चेडर पनीर आणि प्रसिद्ध बेन अँड जेरी आईस्क्रीमच्या उत्पादनासाठी ओळखलं जातं. निसर्ग सौंदर्यामुळे व्हरमाँट पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे, पण दुर्दैवाने या राज्यात केवळ 6,20,000 लोक राहतात. म्हणूनच हे राज्य रिमोट वर्कर ग्रँट प्रोग्रॅम अर्जदारांना दोन वर्षांसाठी 10,000 डॉलर्स म्हणजे जवळपास 7.4 लाख रुपये ऑफर करत आहे. 2018 च्या मेमध्ये, व्हरमाँटचे गव्हर्नर फिल स्कॉट यांनी राज्य उपक्रमाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. त्यानुसार, व्हरमाँटमध्ये जाण्यास आणि राज्यात राहून काम करण्यास इच्छुक लोकांना 10,000 डॉलर्स देतं.

25

जर तुम्हाला बर्फ, हिवाळा आणि आरामशीर जीवन जगायला आवडत असेल तर अलास्का राज्य तुम्हाला तिथे कायमचे राहण्यासाठी पैसे देईल. या प्रदेशाची लोकसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने, सरकार अलास्कातील रहिवाशांना तिथल्या नैसर्गिक साधनांमधून आर्थिक मदत करते. ते वर्षाकाठी 2,072 डॉलर म्हणजेच 1.5 लाख रुपये प्रति व्यक्ती पैसे देतात. पण इथे तुम्हाला किमान एक वर्ष राहावं लागेल.

35

स्वित्झर्लंडमधील अल्बिनॉन शहराची लोकसंख्या वाढवण्यासाठी लोकांना पैसे दिले जात आहेत. इथं सरकार 45 वर्षांखालील लोकांना 20 लाख रुपये आणि लहान मुलांना 8 लाख रुपये देईल. मात्र, तिथं किमान 10 वर्षं राहावं लागेल, अशी त्यासाठी अट आहे. सध्या या शहराची लोकसंख्या केवळ 240 आहे.

45

अँटिकायथेरा हे ग्रीक बेट आहे, त्यांना आपली लोकसंख्या वाढवायची आहे. या बेटाची सध्याची लोकसंख्या केवळ 20 आहे. इथे ग्रीक नागरिकांना बेटावर भेट देण्यासाठी बोलावण्यात आले आहे, परंतु जगभरातील लोकांचेही सरकार स्वागत करत आहे. या बेटावर राहायला येणार्‍या व्यक्तीला पहिल्या तीन वर्षांसाठी सुमारे 45 हजार रुपये महिन्याकाठी पगार दिला जाईल, तसेच जमीन व घरही दिलं जाईल. तिथलं हवामान चांगलं आहे आणि ग्रीस जास्त लोकांचे स्वागत करण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

55

स्पेनमधील पोंगा हे नवविवाहित जोडप्यांसाठी स्वर्ग आहे. इथे राहण्यासाठी सरकार जोडप्यांना दोन लाख 68 हजार रुपये देतं. पोंगा या सुंदर आणि निसर्गरम्य शहरात राहायला येणाऱ्या जोडप्यांना मुलं असतील तर सरकार जास्त पैसे द्यायलाही तयार आहे. सध्या तिथली लोकसंख्या 851 च्या आसपास आहे. सरकार या शहराची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

  • FIRST PUBLISHED :